खेळजगत
कोपरगाव तालुक्यातील…या शाळेतील विद्यार्थ्यांची राजस्थानमध्ये लक्षवेधी कामगिरी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारत स्काऊट गाईडचे १८ वे महाशिबीर राजस्थान येथील रोहत जिल्हा पाली येथे नुकतेच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे उपस्थितीत पार पडले असून सहा दिवस चाललेल्या या कार्यक्रमात जगभरातील सुमारे ३८ हजार २४१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून यात कोपरगावव तालुक्यातील सोमैय्या विद्या मंदिर साकरवाडी येथील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश मिळवले आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राजस्थान मधील पाली येथे संपन्न झालेल्या प्रभात फेरीत महाराष्ट्राची संस्कृती आध्यात्मिक वारसा त्यांनी दर्शविला संपूर्ण जयपूर शहरात वारकरी संप्रदायाचे दिंडीचे प्रदर्शन हरिनामाचा गजर केला होता.त्यामुळे ते सर्वांचे आकर्षण ठरले होते.त्या बाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वारी येथील सोमैय्या विद्यामंदिर साकरवाडी या शाळेचा विध्यार्थी आदर्श स्काऊट उपसंघनायक आदित्य अनिलकुमार सिंग याची राष्ट्रपतींना देण्यासाठी निवड झाली होती.संचालन करणाऱ्या सर्वांनी राष्ट्रपती यांचे अभिवादन केले आहे.भारतासह बांगलादेश,श्रीलंका,यु.एस.नेपाळ,घाना,मलेशिया,मालदीव आदी देशातील स्काऊट विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते.
प्रभात फेरीत सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सोमैय्या विद्यामंदीर साकरवाडीच्या विद्यार्थ्यांची निवड झाली होती.या विद्यार्थ्यांना स्काऊट मास्टर जिल्हा समुपदेशक संजय गडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
सांस्कृतिक कार्यक्रमात भारूड व कलागुण सादर करून उपस्थितांना मंत्रमुद्ध केले तसेच महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची जगाला ओळख करून देतांना फुड प्लाझा या स्पर्धेत साकरवाडी चा स्काऊट शुभम तायडे याने नानाविध पदार्थ बनवुन कौशल्य सिद्ध केले आहे.
सदर शिबिरात हवाई दलाच्या मनमोहक सूर्या किरण प्रदर्शनाने उपस्थितांचे नजरेचे पारणे फेडले आहे.साकरवाडीच्या स्काऊटसनी मंकी ब्रिज,माउंटनिंग,एअर सायकलिंग,कमांडो ब्रिज,टायर वॉल आशा साहसी खेळात सहभाग नोंदवला आहे.
शिबिरात संघनायक आदित्य मगर,उपसंघनायक आदित्य अनिलकुमार सिंग,स्काऊट अमित झालटे,शुभम तायडे,जय ठोंबरे,यश विसपुते, साई लोखंडे,आदित्य भुजंग,संतोष निकम या आदर्श स्काऊट नी सहभाग घेऊन वेगळेपण सिद्ध करून भरीव कामगीरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी मुख्याध्यापिका एस.व्ही.पारे मॅडम,बी.टी.खळदकर,उत्तम बर्डे,श्रीमती भारती वक्ते,सोनाली निकम,सागर भगत,सोपान शिरसाट,संजय राऊत यांचे तसेच राज्य चिटणीस एन.बी.मोटे,अरुण सपकाळे,शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील,अशोक कडुस,जी.जे.भोर,एस.एन.तेलंगे,भाऊसाहेब ठाणगे,प्रभारी तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख,संगीता लांडगे,द्वारका वाळे,काशिनाथ बुचुडे,म्हस्के सर,पगारे सर,संजय मोरे,जाधव, विनया राजगुरू,गायकवाड,गाईड कॅप्टन अनिता शिंदे,सुरडकर अ.नगर जिल्ह्यातील स्काऊट मास्टर व गाईड कॅप्टन आदींचे विशेष मार्गदर्शन लाभले होते.
सदर शिबिरातील या ल्लेखनीय कामगिरीबद्दल सोमैय्या उद्योग समुहाचे अध्यक्ष समिरशेठ सोमय्या,गोदावरी बायो रिफायणारीजचे संचालक सुहास गोडगे,लेफ्टनंट जनरल जगबिरसिंग,वारीचे सरपंच सतिश कानडे,बी.एम. पालवे,दिनेश गुप्ता,सौदागर कुलाल,डॉ.हेमा भडावकर,उर्मी ठक्कर,परवीन शेख,अश्विनी शेळके,प्राचार्या पारे मॅडम आदींनी अभिनंदन केले आहे.