जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात दोन गटांत झुंज,नागरिक वेठीस

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहरात काळ सकाळ पासून आगामी दहीहंडी कार्यक्रमाची कमान उभी करण्यावरून आ.आशुतोष काळे व माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या दोन्ही गटात वाद निर्माण झाला.त्यांच्यात समेट घडवून आणण्यात नगरपरिषद प्रशासनास अपयश आल्याने त्याचे पर्यवसान हाणामारीत होऊन अखेर पोलीस प्रशासनास लाठीहल्ला करावा लागण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.यात पोलीस अधिकारी वासुदेव देसले किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शीघ्र कृती दलाचे जवान तैनात केले आहे.

दरम्यान कोपरगाव तालुक्यात नुकत्याच दोन्ही सहकारी साखर कारखांन्याच्या निवडणुका दोन्ही नेत्यांनी आपसाआपसात बिनविरोध करून पार पाडून घेतल्या आहेत.सभासदांना साधे अर्ज भरण्याची संधी दिली नाही.तर काळेंच्या विरोधात अर्ज भरणाऱ्यांना कोल्हेनीं माघार घ्यायला लावली असताना कार्यकर्ते एकमेकास का झुंजत आहे ? असा सवाल शहरातील सुज्ञ नागरिकांनी उपस्थित केला आहे.व या वेडाचाराबाबत त्यांना दूषणे दिली आहे.

कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.महाराष्ट्रात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो.श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही-लोणी खात असे.त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत.ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते.’गोविंदा आला रे आला,गोकुळात आनंद झाला’ असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे.तर शहरात विविध मंडळे या दिवशी दहीहंडी फोडून उत्सव साजरा करतात.असाच दहीहंडीचा प्रघात कोपरगाव शहरातही संपन्न होत असतो.त्यासाठी विविध मंडळे नगरपरिषदे कडून रितसर परवानगी घेऊन हा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करतात.

कोपरगाव शहरात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांचा पारंपरिक विरोधक (?) भाजप (कोल्हे गट) आहे.त्या दोन्ही गटांनी आपल्या आपल्या मंडळांचा ‘गोपाळ काला’ करण्यासाठी रीतसर नगरपरिषदेकडे परवानगी मागितली होती.त्यासाठी राष्ट्रवादीस छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोरची जागा दिली आहे.तर विरोधी कोल्हे गटास ती विघ्नेश्वर चौकात दिली आहे.यात अर्थात वाद होण्याचे काहीही कारण नव्हते.मात्र राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यानी मात्र एक कमान नेमकी विघ्नेश्वरच चौकात आक्षेपार्ह जागेत उभारली त्याला कोल्हे गटाने हरकत घेतली होती.त्यावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि वादास सुरुवात झाली.यात अर्थातच दोन्ही ठिकाणी नगरपरिषदेने परवानगी दिली असल्याने या वादात भाग घेऊन हा प्रश्न मार्गी लावणे अभिप्रेत होते.मात्र त्यासाठी प्रयत्न करूनही नगरपरिषेच्या अधिकाऱ्यांना सपशेल अपयश आले आहे.त्यामुळे कोल्हे गट त्या जागेवरील कमान काढण्यासाठी हटून बसला.हा तमाशा दिवसभर भर रस्त्यात सुरू होता.त्यामुळे राहदारीस नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.मात्र हा वाद सोडण्यासाठी पालिकेला अपयश आले व कार्यकर्ते हटेना त्यात दोन कार्यकर्ते आपसापसात भिडले असल्याने अखेर शहर पोलिसांचा संयम सुटला होता.अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी साडे नऊ वाजता अखेरचे अस्त्र काढले व थेट गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या हातातील काठ्यांनी धोपटण्यास सुरुवात केली.त्यात पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांचे सह उपस्थित पोलिसांनी अनेक कार्यकर्त्याना पळून-पळून बदडले. मात्र एका अनामिक क्षणी देसले त्यांचा पाय एका खड्यात पडला व त्यात पडून त्यांच्या डाव्या हातास दुखापत झाली आहे.यात फ्रॅक्चर झाले नसले तरी मोठा मुक्का मार लागल्याची खबर आहे.

दोन्ही गटांनी रस्त्यात केलेल्या गर्दीने वाहतुकीस मोठी अडचण झालेली दिसत आहे.

आगामी काळातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा झुंजी लावणे आपल्या मतांच्या पोळ्या भाजणे यातून राजकीय नेते आपला स्वार्थ साधून घेत असल्याने दिसून येत आहे.मात्र याचे शहरातील या कार्यकर्त्याना काही देणे घेणे असल्याचे दिसून येत नाही हे या शहराचे दुर्दैव म्हणायचे दुसरे काय !

दरम्यान या तमाशात कोपरगाव शहराचे पोलीस हे.कॉ.दिलीप तिकोणे यांनी या प्रकरणी आरोपी विक्रम मधुकर नेहरे (वय-२९) सागर मधुकर मेहरे यशवंत चौक,खाटीक गल्ली यांचे विरुद्ध पोलिसांसमोर आपसापसात झुंज करून आरडाओरडा करून एकमेकांना शिवीगाळ करताना आढळून आल्या प्रकरणी भा.द.वि.कलम १६० प्रमाणे गुन्हा दखल केला आहे.त्याना पोलिसांनी समजावून सांगूनही काही उपयोग झाला नाही.

दरम्यान या प्रकरणी जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेशी संपर्क साधला असता यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.भाजपचे माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांचेशी संपर्क साधला असता तोही झाला नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close