जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

बंदुकीचा धाक दाखवून सव्वा लाखांची लूट,कोपरगावात दोघांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी असलेले फिर्यादी महिला हि आपल्या मुलासमवेत ऍक्टिव्हा दुचाकीवरून काल सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नाशिकडून घरी येत असताना त्यांना शहाजापूर हद्दीत पंचाळे रोडवर मळी तलावाजवळ अडवून त्यांना आरोपी संदीप मुळेकर रा.मोतीनगर सुरेगाव व अन्य एक अज्ञात आरोपी यांनी बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे १ लाख १० हजार किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मणी व पॅडल व काळे मणी असलेली पोत घेऊन पोबारा केला असल्याचा गुन्हा फिर्यादी महिला सविता अशोक धनगर (वय-३४) रा.मोतीनगर यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दखल केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान या गुंह्यातील आरोपीस फिर्यादी महिलेने कसे ओळखले हा सवाल निर्माण झाला आहे.यात दोन्ही गटात काही जुन्या कुरबुरी असून त्या वरून हा वाद निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत सुरेगाव आणि तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला व त्यांचा मुलगा हे काल सांयकाळी ५ वाजता नाशिक वरून आपले काम आटोपून आपल्या दुचाकी वाहनावरून घराकडे येत असताना त्यांना आरोपी संदीप मुळेकर व त्याचा एक अज्ञात सहकारी यांनी वरील ठिकाणी अडवले व फिर्यादी महिला सविता धनगर हिच्या गळ्यातील एक लाख ११ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यात अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मणी,सोन्याचे पॅडल,काळे मणी असा अवैज लुटून नेला आहे.

दरम्यान या गुंह्यातील आरोपीस फिर्यादी महिलेने कसे ओळखले हा सवाल निर्माण झाला आहे.यात दोन्ही गटात काही जुन्या कुरबुरी असून त्या वरून हा वाद निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्यादी महिला सविता धनगर यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक जाधव यांचेसह सहाय्यक फौजदार धाकराव यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३१७/२०२२ भा.द.वि.कलम ३९२,३४१,३४ व आर्म ऍक्ट ३/२५ अन्वये दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार धाकराव हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close