जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली व शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीस (वय-१३ वर्ष ९ महिने) त्याच गावातील आरोपी सरोदे याने शाळेतून घरी येत असताना तिचा पाठलाग करून वडिलांचे भ्रमणध्वनी वरील लघुसंदेश दाखवून व धमकी देऊन फिर्यादी मुलीस तिच्या घराचे मागील बाजूस नेऊन शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुलगी हि अल्पवयीन आहे ती कोळपेवाडी येथे माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असून त्याच गावातील सरोदे नामक आरोपीने तिचा डिसेंबर २०२१ (नक्की तारीख आठवत नाही) मध्ये पाठलाग करून तिचा हात धरून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन वडिलांचे भ्रमणध्वनीवर पाठवलेले लघुसंदेश वाचण्यास भाग पाडून तिला तिच्या घराचे पाठीमागे असलेल्या गिन्नी गवतात वारंवार अत्याचार केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलगी हि अल्पवयीन आहे ती कोळपेवाडी येथे माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असून त्याच गावातील सरोदे नामक आरोपीने तिचा डिसेंबर २०२१ (नक्की तारीख आठवत नाही) मध्ये पाठलाग करून तिचा हात धरून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन वडिलांचे भ्रमणध्वनीवर पाठवलेले लघुसंदेश वाचण्यास भाग पाडून तिला तिच्या घराचे पाठीमागे असलेल्या गिन्नी गवतात नेऊन तिचे कपडे काढून तिच्या इच्छे विरुध्द शारीरिक अत्याचार करून तिचे नग्न फोटो काढले व ते छायाचित्र प्रसार करण्याची धमकी देऊन तिच्यावर दि.०६ जून पर्यंत वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
दरम्यान तिला दर आठ पंधरा दिवसांनी घराच्या पाठीमागे बोलावून घेऊन सदर आरोपीने अनेकवेळा शारीरिक अत्याचार केल्याचे म्हटलं आहे.पीडित मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर या प्रकरणी आरोपी विरुद्ध फिर्यादी अल्पवयीन मुलीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान घटनास्थळी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१५/२०२२ भा.द.वि.कलम ३७६ (२) (आय),३५४,(डी) (१) ५०६ सह बालकांचे लैंगिक अत्याचार अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,१२ व माहिती तंत्रज्ञान अधिनियम-२००० चे कलम ६६ (ई) प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातव यांचे मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close