जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात जमिनीच्या वादातून मारहाण,चौघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील फिर्यादीचा जमिनीचा न्यायालयात वाद सुरु असून त्या बाबत खटला सुरु आहे.तो प्रलंबित असताना फिर्यादीने आरोपीच्या वडिलांच्या विरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याचा राग मनात धरून आरोपी प्रशांत जालिंदर संवत्सरकर व त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यानी फिर्यादिस लोखंडी गज व लाकडी दांडक्याने टाकळी शिवारात मारहाण केली असून या प्रकरणी फिर्यादी अतुल शांताराम संवत्सरकर (वय-२२) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने शिंगणापूर व कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीवर काही कारणावरून एक गुन्हा नोंदवला होता.याचा राग आरोपीच्या मनात होता.त्याने तो राग मनात धरून प्रशांत संवत्सरकर व त्याचे अन्य सहकारी आरोपी अमोल विठ्ठल संवत्सरकर,अनिल रामदास संवत्सरकर,सुनील कैलास संवत्सरकर सर्व रा.संवत्सरकर आदींनी फिर्यादी अतुल संवत्सरकर यास शनिवार दि.११ जून रोजी दुपारी ३.१० वाजेच्या सुमारास टाकळी शिवारात फिर्यादी यांचे रहाते घरात घुसून आरोपींच्या वडीलाविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींचा राग मनात धरून त्यास लाकडी दांडा व लोखंडी गजाच्या सहाय्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी अतुल संवत्सरकर व आरोपी प्रशांत संवत्सरकर यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद आहे.त्या बाबत कोपरगाव न्यायालयात खटला सुरु आहे.दरम्यान फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीवर काही कारणावरून एक गुन्हा नोंदवला होता.याचा राग आरोपीच्या मनात होता.त्याने तो राग मनात धरून प्रशांत संवत्सरकर व त्याचे अन्य सहकारी आरोपी अमोल विठ्ठल संवत्सरकर,अनिल रामदास संवत्सरकर,सुनील कैलास संवत्सरकर सर्व रा.संवत्सरकर आदींनी फिर्यादी अतुल संवत्सरकर यास शनिवार दि.११ जून रोजी दुपारी ३.१० वाजेच्या सुमारास टाकळी शिवारात फिर्यादी यांचे रहाते घरात घुसून आरोपींच्या वडीलाविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींचा राग मनात धरून त्यास लाकडी दांडा व लोखंडी गजाच्या सहाय्याने मारहाण करून शिवीगाळ करून जमिनीत पुन्हा पाय ठेवला तर जिवंत सोडणार नाही असा सज्जड दम दिला आहे.या प्रकरणी फिर्यादी अतुल संवत्सरकर याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१६५/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,४५२,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close