जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात पती-पत्नीचा खून,तर्कवितर्कांना उधाण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या आपेगाव ग्रामपंचायत हद्दीत पूर्वेस गावापासून सोमवारी रात्रीच्या सुमारास रहिवासी असलेले शेतकरी दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय-६५) व त्यांची पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय-६०) हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असताना अज्ञात आरोपींनीं त्यांना लोखंडी गजाच्या सहाय्याने रात्रीच मारून टाकले आहे.त्यांच्या पुणे स्थित मुलांना दोन दिवसापासून आपल्या आई-वडिलांचा घरी फोन उचलला जात नाही.त्यामुळे मुलांना शंका आल्याने त्यांनी आपल्या चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना घरी जाऊन चौकशी करण्यास पाठवले असता हि भयावह घटना उघड झाली आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दोन दिवस होऊनही आपले आईवडील आपला फोन उचलत नाही म्हणून त्याच्या पुणे स्थित मुलांना शंका आली होती.म्हणून त्यांनी आज आपले चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन लावला.व आपले आई आणि वडील फोन उचलत नाही काय भानगड आहे.म्हणून तू घरी जाऊन स्थिती जाऊन बघ अशी विनंती केली होती.सदर चुलत बंधू हे घरी गेले असता तेथे त्यांच्या घरास कुलुप होते.म्हणून त्यांनी खिडकीतुन डोकावून पाहिले मात्र आत त्यांना कोणताही सुगावा लागला नाही.म्हणून त्यांनी शेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावर जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.त्यात ते दोघे नवरा आणि बायको त्यांना मृत अवस्थेत आढळून आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस तीळवणी गावाच्या ईशान्य दिशेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर आपेगाव हे खेडे आहे.गावाच्या पूर्वेस साधारण एक कि.मी.अंतरावर आपल्या शेतात घर करून रहात असलेले शेतकरी दत्तात्रय भुजाडे व त्यांची पत्नी हे राधाबाई भुजाडे दोघे राहत होते.त्यांना दोन मुले असून ते उच्च शिक्षित असून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत.त्यांनी आपल्या आई आणि वडिलांना सोमवार दि.३० मे पासून फोन करत होते.मात्र त्यांचा फोन ते उचलत नव्हते.त्यांना आधी काही शेताच्या कामात असतील अशी शंका होती.

दरम्यान काही दिवसापूर्वी या जोडप्याने आपल्या विहिरीचा गाळ काढण्याच्या कारणावरून काही व्यक्तींशी वाद झाला असल्याची माहिती हाती आली असून त्यातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींनी हा प्रताप केला असल्याचा कयास व्यक्त होत आहे.

मात्र दोन दिवस होऊनही ते आपला फोन उचलत नाही म्हणून शंका आली होती.म्हणून त्यांनी आज आपले चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन लावला.व आपले आई आणि वडील फोन उचलत नाही काय भानगड आहे.म्हणून तू घरी जाऊन स्थिती जाऊन बघ अशी विनंती केली होती.सदर चुलत बंधू हे घरी गेले असता तेथे त्यांच्या घरास कुलुप होते.म्हणून त्यांनी खिडकीतुन डोकावून पाहिले मात्र आत त्यांना कोणताही सुगावा लागला नाही.म्हणून त्यांनी शेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावर जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.त्यात ते दोघे नवरा आणि बायको त्यांना मृत अवस्थेत आढळून आले आहे.त्यांनी या कामी तीळवणी येथील पोलीस पाटील सुदाम शिंदे यांना या धक्कादायक घटनेची माहिती दिली.या प्रकरणी पोलीस सूत्रांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

त्यांनी या प्रकरणी शहानिशा करून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.दरम्यान या ठिकाणी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सदर शव ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रवाना केले आहे.अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही.ती प्रक्रिया सुरु आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जादाहव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close