जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी व घरकाम करत असलेल्या महिलेला ‘ती’ घरी असताना पैशाचे कारणावरून जेऊर कुंभारी येथील तीन सख्खे भाऊ असलेले जेऊर पाटोदा आरोपीनी आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास,तु,”आमचे पैसे दे अन्यथा आमचे सोबतच चल” असे म्हणून विनयभंग केला असून वाचविण्यास आलेल्या पतीला मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे जेऊर-कुंभारी आणि कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

जेऊर कुंभारी येथील आरोपीनी घरासमोर येऊन ‘तू,”आमचे पैसे दे अन्यथा आमचे सोबतच चल” तर लहान भाऊ असलेला आरोपी यानेतील विवस्त्र करण्याचे उद्देशाने साडी पकडून ती ओढली व तसेच ब्लाउज फाडला आहे.या प्रकरणात महिलेचा पती तिला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करून हातात दगड घेऊन शिवीगाळ करून,”आमचे पैसे दिले नाही तर तुम्हाला सोडणार नाही” अशी धमकी दिली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला व तिचा पती हे जेऊर कुंभारी येथील रहिवासी असून त्यांचा काही आर्थिक व्यवहार होता,त्यातून जेऊर कुंभारी येथील राजकीय वारसा असलेले व जेऊर पाटोदा सेवा संस्थेशी संबधित व ईशान्य गडाशी संबंधित सख्खे भाऊ असलेले आरोपी तिन्ही आरोपीनी आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिच्या घरासमोर येऊन ‘तू,”आमचे पैसे दे अन्यथा आमचे सोबतच चल” तर लहान भाऊ असलेला आरोपी याने तीला विवस्त्र करण्याचे उद्देशाने साडी पकडून ती ओढली व तसेच ब्लाउज फाडला आहे.या प्रकरणात महिलेचा पती तिला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता त्यांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करून हातात दगड घेऊन शिवीगाळ करून,”आमचे पैसे दिले नाही तर तुम्हाला सोडणार नाही” अशी धमकी दिली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी महिलेने विनयभंग केला असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.त्यामुळे जेऊर पाटोदा आणि कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१४८/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,(ब) ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close