जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचे प्रेत आढळले,कोपरगाव तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारातील गट क्रं.३६ मध्ये शेतातील एका पडक्या खोलीत अंदाजे वय २०-२५ वय वर्ष असलेल्या अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या व फुगलेल्या स्थितीत आढळून आल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.त्यामुळे हा खून की आणखी काही याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान सदर प्रेत कोपरगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शिर्डी येथे रवाना केले असून सदर तपासणी अहवाल आल्यावर हा गुन्हा आहे की आत्महत्या याचा तपास लागण्यास मदत मिळणार आहे.

सदरचे सविस्तर वृत असे की,खबर देणार चांदेकसारे येथील डॉ.गोरक्षनाथ शंकरराव रोकडे यांनी खबर दिली की,घारी ग्रामपंचायत शिवारात गट क्रं.३६ मध्ये दौलत दामू होन यांचे शेतात पडकी खोली असून त्यात अनोळखी महिलेचे प्रेत दि.२४ एप्रिल रोजी दुपारी ०२.३० आढळून आले असून
आले आहे.सदर महिला हि अंदाजे वीस ते पंचवीस वर्ष वयाची असून तिचे प्रेत हे कुजलेल्या व फुगलेल्या स्थितीत मिळून आले आहे.

दरम्यान डॉ.रोकडे यांनी हि खबर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ कळवली आहे.
दरम्यान याची गंभीर दखल घेऊन शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,सहाय्यक फौजदार महेश कुसारे यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद दप्तरी क्रं.२९/२०२२ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

दरम्यान सदर प्रेत कोपरगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शिर्डी येथे रवाना केले असून सदर तपासणी अहवाल आल्यावर हा गुन्हा आहे की आत्महत्या याचा तपास लागण्यास मदत मिळणार आहे.वर्तमानात या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास असमर्थता दर्शवली आहे.

दरम्यान या ग्रामपंचायत हद्दीत अशी महिला बेपत्ता नसल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आपले पापकृत्य झाकण्यासाठी इतर ठिकाणी गुन्हा करून सदर महिलेचे प्रेत या ठिकाणी आणून टाकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेने घारी,चांदेकसारे,सोनेवाडी परिसरासह कोपरगाव तालुक्यात हा खून की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close