जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव कोविड केंद्रासाठी मशीनरीच्या माध्यमातून १८.१० लाखांची मदत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जीवघेण्या कोरोना संकटात सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच आज १८ लाख १० हजार रुपये किंमतीचे मशिनरी दिली आहे.यात पाच बायपॅप मशीन,मॉनेटर,थ्री पॅरो मॉनेटर,ऑक्सिजन लाईन १०० पोर्ट,सर्जिकल ट्रॉली,मेडिसिन क्रश कार्ड, इसीजी मशीन आदी साहित्याचा समावेश आहे.त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्रातही रोज साठ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असून अनेकांना प्राण वायू मिळणे अवघड बनले आहे.अनेक रुग्णांचा प्राण वायू अभावी मृत्यू होत आहे.कोपरगावतही प्राण वायूची कमतरता आहे.व मोठ्या प्रमाणात कोरोना मृत्युदर वाढला आहे आगामी काळात प्रतिदिन पाच हजार मृत्यू होणार असल्याचे भाकीत नुकतेच एका अमेरिकन विद्यापीठाने केले आहे या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी दिलेली मदत महत्वपूर्ण मानली जात आहे.

सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे.यामध्ये आता दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची भर पडतेय.गेल्या चार दिवसात देशात १३ लाख नव्या रुग्णांची भर पडली असून शनिवारी जवळपास साडेतीन लाख लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. तसेच शनिवारी एकाच दिवशी २ हजार ७६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.ही आकडेवारी जगाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.महाराष्ट्रातही रोज साठ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असून अनेकांना प्राण वायू मिळणे अवघड बनले आहे.अनेक रुग्णांचा प्राण वायू अभावी मृत्यू होत आहे.कोपरगावतही प्राण वायूची कमतरता आहे.व मोठ्या प्रमाणात कोरोना मृत्युदर वाढला आहे आगामी काळात प्रतिदिन पाच हजार मृत्यू होणार असल्याचे भाकीत नुकतेच एका अमेरिकन विद्यापीठाने केले आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी दिलेली मदत महत्वपूर्ण मानली जात आहे.

यावेळी बोलतांना आ. काळे म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.जम्बो कोविड केअर सेन्टरच्या माध्यमातून बाधित रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.मात्र अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्यामुळे एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्राथमिक स्वरूपात १०० ऑक्सिजन बेडची तयारी जलदगतीने सुरु असून तळमजल्यावरील सर्व काम पूर्ण झाले आहे.आज जरी १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन असेल तरी भविष्यात परिस्थिती पाहून अधिक ऑक्सिजन बेड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन त्यानी दिले आहे.सध्या जरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असा तरी हि परिस्थिती लवकरच बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता नागरिकांनी अजून काही दिवस अजून सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे सर्वांच्या सहकार्याने आपण कोरोना संकटावर पुन्हा नियंत्रण मिळवू असा आशावाद व्यक्त केला.यावेळी त्यांनी एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या वसतिगृहात १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यासाठी सुरु असलेल्या कामाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या असल्याचे वृत्त आहे.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादीचे नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे,डॉ.कृष्णा फुलसौन्दर,तालुका आरोग्याधिकारी डॉ.संतोष विधाते,डॉ.अजय गर्जे,डॉ.वैशाली बडदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close