पर्यटन व तीर्थक्षेत्र
“महादेव कोळी चौथऱ्याचा स्मारक म्हणून विकास करा”-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
शिवनेरी प्रांतात मोगलांना धाक बसवणाऱ्या महादेव कोळी समाजाच्या त्यागाची महती सांगणाऱ्या महादेव कोळी योद्धयांचा ‘त्या’ चौथऱ्याचा स्मारक म्हणून विकास करा अशी मागणी आदिवासी कोळी महादेव युवक संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित आगलावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अकोल्याचे आ.डॉ. किरण लहामटे यांचेकडे राजूर भेटीत केली आहे.
शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी ‘वीर खेमा’ नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले.दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन दक्षिणेत आला होता.त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले त्यातून हे मोगल सेनेच्या हातून हत्याकांड घडले तोच हा चौथरा.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी ‘वीर खेमा’ नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले.दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन दक्षिणेत आला होता.त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले.एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले.मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तमाम लोक पकडून आणून कापले गेले.नाईकास निर्वंश केले गेले आणि सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरे कापली गेली. त्या शिरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा आजही तो शिवनेरीवर पाहावयास मिळतो.
वर्तमानात दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत.इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते.या पराक्रमाची गाथा सांगणा-या महादेव कोळी चौथरा स्मारकास शासनाने तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देवून त्या ठिकाणाचा विकास करण्यात यावा,आदिवासी शुरवीरांची शिल्पे उभारण्यात यावी,महाराष्ट्रातील सर्व आदिवासी क्रांतीकारक व स्वातंत्र्य लढयातील योध्यांची दुक श्राव्य स्वरूपात अभ्यासिका निर्माण करण्यात यावी.एका शंभर आसनी अॅम्पीथिएटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून आदिवासी संस्कृती,कला,संगित इ.चा माहीतीपट थ्रीडी स्वरूपात दाखविण्यात यावी.सुंदर नक्षत्र व वन औषधी उदयान निर्माण करून प्रत्येक आश्रमशाळेसह अन्य विदयार्थ्यांची सहली नेण्याची व्यवस्था करण्यात यावी.दरवर्षी आदय क्रांतीकारक राघोजी भांगरे जयंती निमित्ताने या ठिकाणी ‘आदिवासी कला महोत्सव’ महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
सदर निवेदनावर मनोहर शिंदे,अशोक उंडे,सुरेश पांडे,सुनील पोरे,चंद्रकांत शेजुळ,नंदकुमार लांडगे,अनिल पारधी आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.सदर प्रसंगी आ.डॉ.लहामटे यांनी महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.