गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा,एकावर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध केलेला असतानाही डाऊच बुद्रुक ग्रापंचायत हद्दीत आरोपी अनिल शाक (पूर्ण नाव उपलब्ध नाही) याने विनापरवाना आपल्या निळ्या रंगाच्या स्वराज ७४४ या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास वाळू घेऊन जाताना आढळून आला त्याची गुप्त खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागली त्यांनी संबंधित गावात धाड टाकून त्यास रंगेहात पकडले आहे.मात्र रोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्यावर गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी वाळू चोरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
डाऊच बुद्रुक गावानजीक रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास एक निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ७४४ एफ.ई.हा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर हा वाळू चोरी करून जाण्याच्या मार्गावर असल्याची गुप्त खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या ठिकाणी सापळा लावला असता.त्या ठिकाणी वरील वर्णनाचा ट्रॅक्टर एक ब्रास वाळू चोरी करताना आढळून आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव या ठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते सडे हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी वाळूला मिळणारे सोन्याचे भाव पाहून हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.या बाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात याचिका दाखल होऊनही त्या आदेशास वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी (?) दाखवून दिली आहे.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पहात नाही.अशीच घटना डाऊच बुद्रुक शिवारात घडली आहे.
डाऊच बुद्रुक गावानजीक रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास एक निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ७४४ एफ.ई.हा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर हा वाळू चोरी करून जाण्याच्या मार्गावर असल्याची गुप्त खबर कोपरगाव शहर पोलिसांना लागली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या ठिकाणी सापळा लावला असता.त्या ठिकाणी वरील वर्णनाचा ट्रॅक्टर एक ब्रास वाळू चोरी करताना आढळून आला आहे.एक ब्रास वाळूसह ०३ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.त्यांनी त्या ठिकाणी त्यास रंगेहात पकडला असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.मात्र आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यास यशस्वी झाला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.संभाजी शिंदे यांच्या फिर्यादीनुसार आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३०९-२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.पी.बी.ढाकणे हे करित आहेत.