आरोग्य
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा आलेख पुन्हा चढा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात घसरत असंताना दिसत आहे.सरकारने आता विविध उपाय योजना करून लसी देण्याचे प्रमाण वाढवले आहे.मात्र कोपरगाव,संगमनेर,राहाता तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुःखी वाढली आहे.कोपरगाव शहरात -०५ अशी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे तर तालुक्यात १० रुग्णवाढ नोंदवली आहे.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५४० रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०३ रुग्ण बाधित आढळले असून ५३७ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५५० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०८ तर अँटीजन तपासणीत ०३ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०४ असे एकूण अहवालात थोडी वाढ होऊन केवळ १५ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ०९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३५ हजार ४६० झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ५०९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख २५ हजार ००५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ९४५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.पुढाऱ्यांचे वाढदिवस,यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि नगर जिल्ह्यात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे. त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.राहाता तालुक्यात आता दुकाने सकाळी आठ ते दुपारी चार वाजे पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास आदेश दिले आहे.व आठवडे बाजार प्रारंभ केला आहे.जिल्ह्यात जवळपास एकसष्ठ गावे प्रतिबंधित केले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील गोधेगावचा समावेश असून या तालुक्याचा आलेख अलीकडील काळात चिंताजनक वाढला आहे.त्यामुळे प्रशासनाने आता कोरोना लसीचा वेग विलक्षण वाढवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही रुग्णसंख्या रोडावण्यास मदत होत आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ६४५ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १०५ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २२२ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०२ लाख ०७ हजार १६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०८ लाख २८ हजार ६४४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०७.०७ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.७७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.