जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात एकाची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील काळे मळा गोरक्षनाथ कॉलनी येथील रहिवासी असलेले इसम लक्ष्मण काशिनाथ नेवगे (वय-७६) यांनी आज रात्री १० वाजे नंतर व पहाटे ०५ वाजेच्या आत कधीतरी आपल्याच घराचे गॅलरीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.या प्रकरणी त्यांचे चिरंजीव दिलीप लक्ष्मण नेवगे (वय-४८) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.या घटनेने कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार मयत हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते.व आपले स्वतःवरील नियंत्रण हरवून बसले होते.त्यातूनही दुर्दैवी घटना घडली असल्याचे समजते.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह सहाय्यक फौजदार एस.सी.पवार यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनीं या प्रकरणी आज सकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.५२/२०२१ सी.आर.पी.सी.१८४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौंजदर पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close