जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात एर्टीगा-दुचाकी अपघात,दोन जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर डाऊच खुर्द फाट्याजवळ आज दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास संगमनेर कडून कोपरगावकडे वेगाने जाणाऱ्या मारुती एर्टीगाने कोपरगावकडून झगडेफाट्याकडे जाणाऱ्या बजाज डिस्कव्हर या दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील इसम बाळासाहेब बाबुराव येवले (वय-५२) व मकरंद मोहन गुंजाळ (वय-२१) दोघे रा.पाथरे ता.सिन्नर हे गंभीर जखमी झाले आहे.या वेळी संजय लाला होन यांनी तातडीने रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांना दूरध्वनी करून जखमींना खाजगी रुग्णालयात भरती केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.यात दुचाकीला एर्टीगाची इतकी जोरात धडक बसली की दुचाकीचे इंजिन फुटले आहे.यात दुचाकीस्वाराच्या पायाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधी याच वेळी दुर्घटनेनंतर काही वेळात आल्यावर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांना हा घटनेबाबत कळवले असून त्यांनी घटनास्थळी पोलिसांची कुमक पाठवून दिली आहे.याबाबत उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,दुचाकीस्वार बाळासाहेब येवले व मकरंद गुंजाळ हे आज रविवार दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी आपले काम आटोपून कोपरगाव कडून आपल्या घरी आपली काळ्या रंगाची बजाज डिस्कव्हर (क्रं.एम.एच.१५,डी. एक्स.९९०१) वरून पाथरे येथे जात असताना समोरून येणाऱ्या व कोपरगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मारुती एर्टीगाने (क्रं.एम.एच.०४,के.एल.७५८०) जोराची धडक दिली.त्यात दुचाकीची मोठे नुकसान झाले आहे.या अपघातात दुचाकीचे मशीन चक्काचूर झाले आहे.या शिवाय एर्टीगा या कारची उजवी चालकांच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.यात पुढील चाकाच्या बाजूचे डिक्स तुटले आहे.दरम्यान घटनास्थळी नजीकच्या नागरिकांनी धाव घेतली.डाऊच खुर्द येथील इसम संजय होन यांनी समयसुचकता दाखवत रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांना भ्रमणध्वनी करून तातडीने पाचारण केले.त्यानी घटनास्थळी येऊन या जखमींना तातडीने खाजगी रुग्णलयात भरती केले आहे.त्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.तरीही प्रत्यक्ष दर्शीनी या दुर्घटनेत बाळासाहेब येवले यांचा उजवा पाय गुडघ्यापासून चक्काचूर झाल्याची माहिती दिली आहे.तर दुसरा इसम मकरंद गुंजाळ यांच्या पायाला मोठी जखम झाल्याचे सांगितले आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधी याच वेळी दुर्घटनेनंतर काही वेळात आल्यावर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांना हा घटनेबाबत कळवले असून त्यांनी घटनास्थळी पोलिसांची कुमक पाठवून दिली आहे.याबाबत उशिरा पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close