जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दोन गटात राडा,हॉटेलसह दोन दुकानांची तोडफोड,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात मध्यवस्तीत असलेल्या खुल्या नाट्यगृहाशेजारी असलेल्या हॉटेल ग्रँड समोर रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात चांगलीच हाणामारी झाली असून त्यांनी हॉटेल ग्रँड व अजय ड्रेसेस या आस्थापनांची तोडफोड केली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या दोन गटांना काबूत आणल्याने पुढील अनर्थ टाळला आहे.दरम्यान यात आरोपी आकाश राखपसरे सह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.व आरोपींना पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगलीच अद्दल घडवली असल्याचे बोलले जात आहे.

कोपरगाव खुल्या नाट्यगृहाचा दक्षिणेस असणाऱ्या काही टपरी वजा व्यापारी संकुलात अवैध व्यवसाय जोरात सुरु असून या ठिकाणी हप्ते गोळा करण्याच्या कारणावरून हा गदारोळ झाल्याचे बोलले जात आहे.या ठिकाणी सुरु असलेल्या व्यवसायातील नागरीकांना या टोळीचा मोठा उपद्रव सुरु आहे.त्या ठिकाणी हे तरुण छोट्या मोठ्या चोऱ्या करत असून त्याने या भागातील व्यावसायीक वैतागलेले आहेत.

भाद्रपद महिना लागला की सगळ्यांना चाहूल लागते ती लाडक्या बाप्पाची.बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज होतं असतात.मात्र यंदाच्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.नागरिकही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत.कोपरगाव शहरातही नगराध्यक्ष विजय वहाडणे,तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरिक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी गणोशोत्सव साध्या पद्धतीने व ‘एक गाव,एक गणपती’ या सरकारी धोरणानुसार करण्याचा निर्णय घेतला आहे.अशातच कोपरगाव सह राज्यात दुसरीकडे यंदाच्या वर्षी अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.याच आठवड्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशी परिस्थिती असली तरी राज्यभरात गणरायाचं आगमन सध्या पद्धतीने मात्र उत्साहात होत आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.मात्र त्याला रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास काही तरुणांनी आपल्या आततायी पणामुळे गालबोट लावले आहे.शहरात सर्वत्र शांतता असताना अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाशेजारी असलेल्या हॉटेल ग्रँड समोर अवैध व्यवसायात असणाऱ्या काही तरुणांच्या टोळक्याने या शांतता भंग करण्याचे काम केले आहे.याबाबत शहर पोलिसांना खबर मिळाली की काही करून या ठिकाणी हाणामारी करत असून दुकानांची तोडफोड करत आहे.याची खबर शहर पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनाही मिळाली त्यांनी आपले अधिअकारी व कर्मचारी यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी दोन तरुणांचे गट आपापसात हाणामारी करताना आढळून आले.त्यांना शांत राहून आपापल्या घरी जाण्याचे आवाहन करूनही ते ऐकण्याचे स्थितीत नव्हते अखेर पोलिसांना आपले ठेवणीतले अस्त्र काढावे लागले व त्यांनी दिसेल त्याला चोपविण्यास प्रारंभ केला व त्यांना काबूत आणण्याचा गणेशा केला तेंव्हा कुठे हे तरुण काबूत आले तर काही तरुण या गदारोळात पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी आकाश हरिभाऊ राखपसरे (वय-१९),गौरव संजय सरोदे (वय-१९),तुषार संजय ठोकळ,(वय-२०),शुभम केशव राखपसरे (वय-१९) रा.गजानन नगर व अन्य दोघे आदींविरुद्ध गु.र.क्रं.२७७/२०२१ भा.द.वि.कलम १६०,४२७,मुंबई पोलीस कायदा कलम ३७,(१),(३),प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान पोलिसांनी या सामाजिक शांतता भंग करणाऱ्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे या सह पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कडक कारवाई केल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या असामाजिक तत्वांना चांगलाच चाप बसला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री ठोंबरे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close