जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील ‘त्या’ तलाठयास दोन दिवसांची पोलीस कोठडी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (वय-३२) याने तक्रारदाराकडून वाळूचोरीचे वाहनावर कारवाई टाळण्यासाठी रुपये २८ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक केलेल्या तलाठ्यास नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सरकारी वकील अड्.अशोक वहाडणे यांनी दिली आहे.

‘हा’आरोपी तलाठी व एक उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातून बदलून आलेला अधिकारी त्यांची अभद्र युती असून त्यांनी त्या ठिकाणचे असे दोन कनिष्ठ महसूल कर्मचारी आपल्या या ‘अर्थपूर्ण’ कारणासाठी बोलावून बदली करून आणले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.अनेक शेतकऱ्यांना बळी ठरवले जात आहे.त्यातून त्यांची मोठी पिळवणूक होत आहे.या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

नगर जिल्हाधिकारी यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यास प्रतिबंध केलेला असताना वाळूचोर महसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने बिनधास्त वाळूचोरी करताना दिसत आहे.त्या बाबत आमच्या प्रतिनिधीने या पूर्वीच या वाळूचोरांचे व महसुली कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड केले असतानाही महसूल विभाग त्याकडे कानाडोळा करताना दिसत आहे.त्यातूनच वाळूचोर आणि महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे संबंध नुकतेच उघड झाले होते.अशीच घटना नुकतीच घडली असून कोपरगाव येथील एका बत्तीस वर्षीय इसमाकडून त्याचे वाळूचोरीत सापडलेले वाहन सोडण्यासाठी ६८ हजार रुपये रकमेची मागणी धोत्रे येथील तलाठी सुशील शुक्ला या नादान तलाठ्याने केली होती.त्या नंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभाग नाशिक यांचेकडे रीतसर तक्रार केली होती.व त्या प्रमाणे लाचलुचपत विभागाने त्यासाठी कोपरगावात या तलाठ्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता.त्या नुसार त्यांनी तक्रारदाराने या तलाठ्याकडे तडजोड रक्कम म्हणून २८ हजार रुपये ठरवले होते.व ती रोख २८ हजारांची प्रक्रिया केलेली रक्कम लाच लुचपत विभागाने तक्रारदाराकडे सुपूर्त केली होती.त्यात त्याला अटक अकरण्यात आली होती. लाचलुचपत विभागाने या प्रकरणी या तलाठ्यास नुकतेच कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलसी कोठडी सुनावली आहे.

दरम्यान याबाबत नागरिकांच्या या तालाठ्याबाबत अनेक तक्रारी नागरिकांनी ककेल्या असून शेतकऱ्यांच्या विविध नोंदी करण्यासाठी या महाशयाने शेतकऱ्यांकडून हजारो रुपये उकळले आहे.हा तलाठी व एक उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यातून बदलून आलेला अधिकारी त्यांची अभद्र युती असून त्यांनी त्या ठिकाणचे असे दोन कनिष्ठ महसूल कर्मचारी आपल्या या ‘अर्थपूर्ण’ कारणासाठी बोलावून बदली करून आणले असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.अनेक शेतकऱ्यांना बळी ठरवले जात आहे.त्यातून त्यांची मोठी पिळवणूक होत आहे.या प्रकरणी लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे.अनेक तलाठी हे इतर अधिकारात सातबारा उताऱ्यात चुका करून ती शेतकऱ्यांवर लादल्या जात असून त्यातून अपिलात जाण्यास भाग पाडून त्यांची मोठी आर्थिक लुबाडणूक होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे.हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे.या तलाठी व व अधिकारी हे नजीकच्या गावाचे व एका शाळेतील व जुने मित्र असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close