जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नंगी तलवार घेऊन गावात दहशत,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेला आरोपी सतिष छगन संवत्सरकर (वय-४०) याने आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बेकायदेशीर रित्या तलवार आपल्या हाती बाळगून गावात नऊ चारी परिसरात शांतता भंग करून दहशत माजवली असल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.

शिंगणापूर हद्दीत नऊ चारी परिसरात आरोपी सतीश संवत्सरकर याने आपल्या हाती नंगी तालावर घेऊन गावात फिरून गावात दहशत केली असल्याची खबर कोपरगाव पोलिसांना लागली होती.कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन कारवाई केली आहे.त्याबद्दल ग्रामस्थानीं समाधान व्यक्त केले आहे.

सदरची सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या इशान्येस शिंगणापूर ग्रामपंचायत असून या हद्दीत नऊ चारी परिसरात आरोपी सतीश संवत्सरकर याने आपल्या हाती नंगी तालावर घेऊन गावात फिरून गावात दहशत केली असल्याची खबर कोपरगाव पोलिसांना लागली होती.कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी धाडून त्याची शहनिशा केली असून या प्रकरणी हि बातमी खरी निघाली असल्याचे निदर्शनास आले आहे.आरोपीने आपल्या हाती एक शंभर रुपये किंमतीची व ५४ से.मी.लांबी असलेली लाकडी मूठ असलेली तलवार आपल्या हाती घेऊन दहशत माजवली होती व गावातील शांतता भंग केली होती.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.गणेश मैड यांनी पोलीस दप्तरी गु.क्रं.१७२/२०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व महा.पोलीस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close