जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील वाढत्या असंतोषाची दखल घ्या-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावची संपुर्ण प्रशासकिय यंत्रणा,लहान मोठे व्यापारी,व्यावसायिक व जनतेच्या सहकार्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला गेला आहे.पंधरा दिवसांच्या जनता संचारबंदीमुळे रुग्णसंख्या वेगाने कमी झाली आहे.मृत्युचे प्रमाणही घटले आहे.दिड वर्षांपासून सर्वांच्याच जीवनावर विपरित परिणाम झालेला असल्याने आर्थिकदृष्ट्या सर्वजण कोलमडून पडले आहेत.दैनंदिन गरजा भागविणेही कठिण झाले आहे.असा परिस्थितीत प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा जास्त अंत न पाहता त्वरित टाळेबंदी उठवावी व व्यापारी आस्थापणे उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

“कोपरगाव शहरात कोरोनाचे रुग्ण किमान पातळीवर आले आहेत.शिवाय शासकीय नियमाप्रमाणे चाळीस टक्के कोरोना खाटा रिकाम्या आहेत.त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य केल्याने कोरोना साथ नियंत्रणात आली आहे.आता व्यापाऱ्यांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी ताबडतोब उठवायला हवी”-ओमप्रकाश कोयटे,अध्यक्ष कोपरगाव व्यापारी महासंघ.

महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय.पण अशातच आणखी एक धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ज्या लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती,त्याची आकडेवारी समोर आली आहे.जी अत्यंत धक्कादायक आहेत.महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की,केवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात जवळपास आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.महाराष्ट्र सरकारनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा गंभीर धोका लक्षात घेत,राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना प्रभाग तयार करण्याची तयारी सुरु केली आहे.अशातच ज्या तालुक्यात कोरोना रुग्ण लक्षणीय रित्या कमी झाले आहे.त्या तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने चालू करण्यासाठी परवानगी द्यावी असा घोषा लावला आहे.त्यात कोपरगाव तालुक्याचा समावेश आहे.त्याबाबत नुकतीच एक बैठक कोपरगाव व्यापारी महासंघाने नगराध्यक्ष विजय वहाडणे,व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीत समता पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित केली होती.त्यात हा मुद्दा उपस्थित झाला आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष वहाडणे यांनी हि मागणी केली आहे.या बाबत त्यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”काल झालेल्या शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यावसायिकातील असंतोष बघता येणाऱ्या काळात त्याचा स्फोटही होऊ शकतो अशी स्थिती आहे.या बैठकीला व्यावसायिकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.व्यापारी संघटनेचे ओमप्रकाश कोयटे,कार्याध्यक्ष सुधीर डागा व आपण जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करून कोपरगावचे सर्व व्यवहार पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्या अशी विनंती केली होती.पण त्यांनी मात्र वर्तमानात असमर्थता व्यक्त केली आहे.पण येत्या शुक्रवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पुन्हा याबाबत आढावा घेतला जाणार आहे असे समजते.कोपरगावचे लहान मोठे व्यावसायिक व नागरिक नेहमीच प्रशासनाला सहकार्य करत असतात.सध्या कोपरगावचा कोरोनावाढीचा वेगही मंदावलेला आहे,ऑक्सिजनच्या पुरेशा खाटा उपलब्ध आहेत.म्हणून आता तरी आढावा घेतांना या सर्व सकारात्मक बाजूंचा विचार करून कोपरगावचे सर्व व्यवहार सुरळीत करून सर्वांनाच दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.यानंतरही कोपरगावकर प्रशासनाला सहकार्य करतील असा वीस विश्वास व्यक्त करून असंतोषाचा स्फोट होऊ द्यायचा नसेल तर जनभावनेचा विचार करून विधायक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कोपरगावच्या सर्वच व्यापारी-व्यावसायिक संघटना नेहमीच सहकार्य करतात कधीही वातावरण बिघडू देत नाहीत याचाही सकारात्मक विचार व्हावा.काही बंधने घालून सर्वच व्यवहार सुरू करायला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी शेवटी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close