गुन्हे विषयक
कोपरगावात वाळूचोरांनी खाल्ली उचल,गुन्ह्यात वाढ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात वाळूचोरांनी उचल खाली असून या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.कोपरगावात काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास माहेगाव देशमुख या ठिकाणी आरोपीं फार्म ट्रॅक ३५५ या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर वरील पहिला चालक (नाव माहीत नाही),दुसरा चालक जितेश नंदू मोरे रा. मळेगाव थडी,तिसरा मालक साईनाथ त्रिभुवन (पूर्ण नाव माहित नाही) आदींनी अवैध वाळू उपसा केला असल्याची फिर्याद सुनील राजेंद्र शुक्ला (वय-३४) सुरेगाव यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोरोना साथीचे थैमान सुरु आहे.तालुका प्रशासन या साथीचा प्रतिबंध करण्यास प्रयत्नशील असताना वाळूचोरांनी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोरोना साथीचे थैमान सुरु आहे.तालुका प्रशासन या साथीचा प्रतिबंध करण्यास प्रयत्नशील असताना वाळूचोरांनी आपली हाथ की सफाई दाखविण्यास प्रारंभ केला आहे.अशीच घटना नुकतीच माहेगाव देशमुख ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.कोपरगाव तालुका पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली की,या शिवारात गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु आहे.त्या खबरीवरून तालुका पोलिसानी त्या ठिकाणी दि.२५ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली असता त्या ठिकाणी आरोपीनीं आपल्या विना क्रमांकाच्या फार्म ट्रॅक ३५५ निळ्या रंगाच्या ट्रॅक्टर वरील पहिला चालक (नाव माहीत नाही),दुसरा चालक जितेश नंदू मोरे रा.मळेगाव थडी,तिसरा मालक साईनाथ त्रिभुवन (पूर्ण नाव माहित नाही) आदींनी माहेगाव देशमुख शिवारात ३ हजार ३०० रुपयांची एक ब्रास अवैध वाळू उपसा लाल रंगाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीची सहाय्याने केला असल्याचे निदर्शनास आले आहे.व पोलिसांनी पाठलाग केल्याचे निदर्शनास आल्यावर वाळू रस्त्यात टाकून ट्रेलर सोडून धूम ठोकली असल्याची फिर्याद सुनील राजेंद्र शुक्ला (वय-३४) सुरेगाव यांनी दाखल केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२४/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,५११,३४ प्रमाणे वरील तीन आरोपींवर गुन्हा केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.व्ही.गवसने हे करीत आहेत.