जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात..या रस्त्याचे उदघाटन संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगर परिषद हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज नगरसेविका दीपा वैभव गिरमे यांच्या शुभ हस्ते गवारेंनगर येथे पहिल्या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.

“कोपरगाव नगर परिषद हद्दीत नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे तीन लाखापर्यंतची विकास कामे मार्गी लावण्याचे अधिकार नगरसेवकांना देण्यात आले असून त्या अंतर्गत विविध विकास कामे शहर हद्दीत सुरु आहेत.त्यातील गवारेनगर हा परिसर नुकताच नगरपरिषद हद्दीत समाविष्ट झाला आहे.त्या नंतर या ठिकाणी सुरु होणारे हे पहिलेच काम आहे”-दीपा गिरमे,नगरसेविका,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगर परिषद हद्दीत नगरसेवकांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे तीन लाखापर्यंतची विकास कामे मार्गी लावण्याचे अधिकार नगरसेवकांना देण्यात आले असून त्या अंतर्गत विविध विकास कामे शहर हद्दीत सुरु आहेत.त्यातील गवारेनगर हा परिसर नुकताच नगरपरिषद हद्दीत समाविष्ट झाला आहे.त्या नंतर या ठिकाणी सुरु होणारे हे पहिलेच काम आहे.या उपनगरात नुकतेच तिन लाख रुपयांच्या रस्त्याचे खडीकरणाचे काम नुकतेच मंजूर करून सुरु करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी भाजप कार्यकर्ते वैभव गिरमे,वर्षा गिरमे,दत्तात्रय गवारे,संगीता शिंगाडे,श्री बागडे,मगर विकासक राकेश गवारे.श्री जपे,आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी या कामाचे स्वागत केले आहे.व गिरमे कुटुंबास व नगरपरिषदेचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close