जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात पुन्हा गायींचोरीचे सत्र प्रारंभ,पोलिसांपुढे आव्हान

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात गत वर्षी गायी चोरीने धडाका केला असताना मधल्या काळात मात्र हि गायी चोरी थांबली होती मात्र आता पुन्हा गायीचोरीने उचल खाल्ली असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईक नगर येथील उमेश नानासाहेब नाईक (वय-४७) यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध त्यांची दहा हजार रुपये किमतीची गाय चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी या पशूंची गणना “उपयुक्त पशु” अशी केली आहे.मात्र भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात गायीचे महत्व अनेक प्राचीन ग्रंथांत सांगितले आहे हे निर्विवाद सत्य आहे.त्याला अलीकडील काळात शास्रज्ञाकडून विविध शोधाने दुजोरा मिळत आहेत.त्यामुळे हा विषय तसा नाजूक असून कोपरगावात गत वर्षी गावातील मोकाट गायींना इंजेक्शन देऊन मूर्च्छित करून त्यांना चारचाकी वाहनातून पळवून नेणारी टोळी कार्यरत आहे.

हिंदू धर्मात गाय या पशु अत्यंत पवित्र मानला गेला आहे तर स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांनी या पशूंची गणना “उपयुक्त पशु” अशी केली आहे.मात्र भारताच्या हजारो वर्षाच्या इतिहासात गायीचे महत्व अनेक प्राचीन ग्रंथांत सांगितले आहे हे निर्विवाद सत्य आहे.त्याला अलीकडील काळात शास्रज्ञाकडून विविध शोधाने दुजोरा मिळत आहेत.त्यामुळे हा विषय तसा नाजूक असून कोपरगावात गत वर्षी गावातील मोकाट गायींना इंजेक्शन देऊन मूर्च्छित करून त्यांना चारचाकी वाहनातून पळवून नेणारी टोळी कार्यरत आहे.गत वर्षी याच वादातून एका सत्ताधारी पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा बळीही गेलेला आहे.हा सर्व घटनाक्रम ताजा असताना पुन्हा एकदा गायी चोरीची घटना घडणे धक्कादायक मानले जात आहे.

दरम्यान उमेश नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत आपण गोकुळनगरी येथील रहिवाशी असून आपल्या घरासमोर दहा वर्ष वयाची,खिलार शिंगे असलेली गावरान पांढऱ्या रंगाची गाय बांधून ठेवलेली असताना दि.०८ एप्रिल रोजी तिच्यावर पळत ठेऊन अज्ञात चोरट्याने ती रात्री अकरा वाजेनंतर ते पहाटे साडे तिनच्या दरम्यान पळवून नेली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.क्रं.११५/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close