गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात शाळा संगणकाची चोरी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीतील न्यूज इंन्ग्लिश स्कूल येथे दि.१२ एप्रिलच्या रात्री कधीतरी अज्ञात चोरट्याने शाळेच्या कार्यालयाच्या फाटकाचे कुलूप तोडून कार्यालयातील सुमारे २० हजार रुपये किमतीचे दोन संगणक संच,मॉनिटर सी.पी.यू जु.१० हजार रुपये किमतीचे तीन इन्व्हर्टर बॅटरी, एक इन्व्हर्टर संच,१५ हजार किमतीचा एक प्रोजेक्टर व कुलर,एकूण किंमत अंदाजे ४५ हजार आदींचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला आहे.या प्रकरणी कोपारगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
वर्तमानात कोविडची लाट जोरात सुरु असल्याने शाळांना बंद ठेवावे लागत आहे.कोरोना साथीमुळे नागरिकांना घरातच बसण्याचे शासनाचे आदेश आहेत.त्यामुळे सार्वजनिक संस्था वाऱ्यावर सोडून द्याव्या लागतं आहे.त्याचा फायदा चोरट्यानी न उचलला तर नवल अशीच घटना चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच घडली आहे.
कोपरगाव सह राज्यात कोरोनाचा कहर सुरु असून अनेक नागरिकांचे बळी जात आहे.कोरोना सेंटर आता उपचारासाठी कमी पडत आहे.अशा स्थितीत अनेक नागरिकांचे रोजगार हिरावले जात आहे.त्यामुळे या काळात चोऱ्यांचे सत्र वाढले असून कोपरगाव तालुका पोलिसांच्या काळजीत वाढ झाली आहे.अशीच घटना चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत घडली असून तेथे पाचेंगव येथील शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल असून तेथे चांदेकसारे परिसरातील विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण दिले जाते.सध्या कोविडची लाट जोरात सुरु असल्याने शाळांना बंद ठेवावे लागत आहे.कोरोना साथीमुळे नागरिकांना घरातच बसण्याचे शासनाचे आदेश आहेत.त्यामुळे सार्वजनिक संस्था वाऱ्यावर सोडून द्याव्या लागतं आहे.त्याचा फायदा चोरट्यानी न उचलला तर नवल अशीच घटना चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच दि.०९ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान रात्रीच्या सुमारास घडली आहे.व या शाळेच्या फाटकाच्या कुलूप तोडून शाळेच्या कार्यालयात प्रवेश करून आतील सुमारे २० हजार रुपये किमतीचे दोन संगणक संच,मॉनिटर सी.पी.यू जु.१० हजार रुपये किमतीचे तीन इन्व्हर्टर बॅटरी,एक इन्व्हर्टरर्स संच,१५ हजार किमतीचा एक प्रोजेक्टर व कुलर,एकूण किंमत अंदाजे ४५ हजार आदींचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला आहे.या प्रकरणी फिर्यादी कल्याण दादा होन (वय-५०) नोकरी चांदेकसारे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गु.र.क्रं.११०/२०२१ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.