जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव बस स्थानकात दागिने ओरबाडून तरुणींची धूम

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव बस स्थानकात येऊन भोजडे येथील जागरणाचा कार्यक्रम करून मालेगावकडे जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत असललेल्या सटाणा तालुक्यातील धांदरी येथील रहिवाशी असलेल्या कुटुंबातील महिला बसमध्ये बसत असतानाची संधी साधून तेथे पाळतीवर असललेल्या दोन भामट्या तरुणींनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून पोबारा केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव बस स्थानकावर घडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.याबाबत फिर्यादी महिला रेखा नानाजी चव्हाण (वय-३६) यांनी ज्ञात दोन तरुणींवर गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव बस स्थानकात मालेगावकडे जाणाऱ्या बसची वाट पाहात असताना त्या ठिकाणी दि.२० मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बस लागली असताना त्या बस मध्ये चढत असताना फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोन तरुणींनी ओरबाडून घेतले व काही समजायच्या आत तेथून धूम ठोकली आहे.त्यामुळे कोपरगावात गुन्हा दाखल झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील रेखा नानाजी चव्हाण या महिलेचे कुटुंब असून ते शेतकरी आहे.या महिलेची पुतणी कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील योगेश धट यांच्या घरात दिलेली आहे.त्यांचा नुकताच जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला असून हे कुटुंब परतीच्या प्रवासासाठी कोपरगाव येथील बस स्थानकात जावयाचे त्यांना सोडून दिले असताना ते या बस स्थानकात मालेगावकडे जाणाऱ्या बसची वाट पाहात असताना त्या ठिकाणी दि.२० मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बस लागली असताना त्या बस मध्ये चढत असताना फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोन तरुणींनी ओरबाडून घेतले व काही समजायच्या आत तेथून धूम ठोकली असता हि बाब फिर्यादी महिलेने आपल्या कुटुंबातील पुतणी कोमल चव्हाण हिच्या लक्षात आणून दिली तिने या भामट्या तरुणींचा पाठलाग केला मात्र उपयोग झाला नाही.अखेर या महिलेने हताश होऊन कोपरगाव शहर पोलीस ठाणे गाठले व फिर्याद दाखल केली आहे.

कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८९/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे अज्ञात दोन तरुणी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close