जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव तालुक्यात चांगल्या रस्त्यासाठी प्रयत्नशील-आश्वासन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास साधण्यासाठी सर्वच रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.मतदार संघातील सर्वच प्रमुख रस्ते दर्जेदार करण्यासाठी व प्रत्येक गावांना जोडणारे सुरक्षित आणि चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून चांगल्या रस्त्यांशिवाय मतदार संघाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

“दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांना चांगल्या दर्जाची रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे.मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटाचे आवाहन असतांना रस्त्यांसाठी निधी मिळाला असून मतदार संघातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे”-आ.आशुतोष काळे.

कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत ४३.४६ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मुर्शतपुर फाटा ते मुर्शतपुर गाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे तसेच आ.काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ३ लक्ष निधीतून मुर्शतपुर ते टाकळी शिव रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक हरिभाऊ शिंदे,राहुल जगधने,सरपंच साधनाताई दवंगे,उपसरपंच मनिषाताई गिरमे,अनिल दवंगे,विष्णु शिंदे,नितीन शिंदे,रोहिदास मोरे,संदीप बारवकर,प्रविण गुंजाळ,सुनील गिरमे,आण्णासाहेब शिंदे,भाऊसाहेब शिंदे,हारुणभाई शेख,रामदास केकाण,सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे,दिलीप गाडे,ग्रामसेवक राजपूत,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,”दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांना चांगल्या दर्जाची रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे.मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटाचे आवाहन असतांना रस्त्यांसाठी निधी मिळाला आहे.मतदार संघातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.कोरोना संकट कमी कसे होईल यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत तरीदेखील प्रत्येक नागरिकांनी आपली सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी समजून सर्वांनी कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन शेवटी आ. काळे यांनी केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close