गुन्हे विषयक
अडीच लाखांच्या ट्रॅक्टरची चोरी,गुन्हा दाखल

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानकाजवळील रहिवाशी अदिल नजिर शेख (वय-३३),यांच्या घरासमोर उभा करून ठेवलेला लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ०२ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर शनिवार दि.०२ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेनंतर व दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेच्या अगोदर अज्ञात आरोपीने चोरून लाबाडीच्या इराद्याने पळवून नेला असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
ट्रॅक्टरचे मालक अदिल शेख यांनी आपली नियमित कामे आटोपून आपला ट्रॅक्टर आपल्या घरासमोर उभा करून ठेवला असता रात्री नऊ वाजेनंतर ते झोपी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिले असता त्यांनी आपल्या रात्रीच्या जागी ट्रॅक्टर पहिला असता तो मिळून आला नाही त्यामुळे ते घाबरून गेले त्यांनी गावात इकडे तिकडे त्याचा शोध घेऊन पहिला असता तो मिळून आला नाही.
कोपरगाव शहर व तालुक्यात काही अंशी चोऱ्यांच्या घटनात आढ झाली असून नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात धोत्रे ग्रामपंचायत हद्दीत घडली असून फिर्यादी व ट्रॅक्टरचे मालक अदिल शेख यांनी आपली नियमित कामे आटोपून आपला ट्रॅक्टर (क्रं.एम.एच.१७ ए. ई.७५०६) हा आपल्या घरासमोर उभा करून ठेवला असता रात्री नऊ वाजेनंतर ते झोपी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पहिले असता त्यांनी आपल्या रात्रीच्या जागी ट्रॅक्टर पहिला असता तो मिळून आला नाही त्यामुळे ते घाबरून गेले त्यांनी गावात इकडे तिकडे त्याचा शोध घेऊन पहिला असता तो मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की आपला ट्रॅक्टर कोणी तरी अज्ञात व्यक्तीने वा भामट्याने चोरून नेला आहे.या प्रकरणी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.०५/२०२१,भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मारदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.