गुन्हे विषयक
उसने दिलेले पैसे मागीतल्याने मारहाण,चौघांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उसने दिलेले पैसे परत मागीतल्याचा राग येऊन आरोपी विजय पांडुरंग वाघ,निलेश विजय वाघ,गणेश विजय वाघ,सतीश पांडुरंग वाघ यांनी फिर्यादी रवींद्र माधव वाघ (वय-४०) यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असंल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
धामोरी येथील फिर्यादी रवींद्र वाघ यांचेकडुन घेतलेले उसने पैसे मागीतल्याचा राग आरोपींना आला व त्यातील आरोपी गणेश वाघ याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादी रवींद्र वाघ यास मारहाण केली आहे.व त्यांस लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील फिर्यादी रवींद्र वाघ व आरोपी विजय पांडुरंग वाघ,निलेश विजय वाघ,गणेश विजय वाघ,सतीश पांडुरंग वाघ हे रहिवाशी असून त्यांची घरे जवळ-जवळच आहे.यातील फिर्यादी रवींद्र वाघ याने शनिवार दि.०२ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फिर्यादी रवींद्र वाघ यांचेकडुन घेतलेले उसने पैसे मागीतल्याचा राग आरोपींना आला व त्यातील आरोपी गणेश वाघ याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने फिर्यादी रवींद्र वाघ यास मारहाण केली आहे.व त्यांस लाथा बुक्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी रवींद्र वाघ याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.०८/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पी.बी.काशीद हे करीत आहेत.