जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सोनेवाडीत ट्रॅक्टरला अडवला,तिघां विरुद्ध गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीत ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या ग.क्रं.२६४ मधील शेतात ट्रॅक्टर सुरु असताना त्याला आरोपी ज्योती हरिभाऊ पवार,कृष्णा कल्याणी,शिवानी पवार रा.हिंगणी आडवे येऊन त्यांनी शिवीगाळ केली व दमदाटी केल्याच्या कारणावरून फिर्यादी भाऊराव बहिनाजी माकूणे (वय-७५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीच्या शेताची ट्रॅक्टरच्या साहाय्याने दि.२४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नांगरट सुरु होती.त्यावेळी त्यांच्या शेजारचे शेतकरी मात्र हिंगणी येथील रहिवाशी असलेले आरोपी ज्योती हरिभाऊ पवार,कृष्णा कल्याणी,शिवानी पवार रा.हिंगणी हे त्यांच्या ट्रॅक्टरला आडवे येऊन त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली व दमदाटी केली व नांगरट करण्यास मज्जाव केला त्यावरून हा तंटा निर्माण झाला होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी शेतकरी हे सोनेवाडी येथील रहिवाशी असून त्यांची त्याच गावात शेती असून ते व त्याचे कुटुंब हे शेती करून आपल्या कुटुंबाची गुजराण करतात.वर्तमानात रब्बी पिकांची उभारणी करण्याची कामे वेगाने सुरु आहे.त्यांच्या शेताची ट्रॅक्टरच्या साहाय्याने दि.२४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास नांगरट सुरु होती.त्यावेळी त्यांच्या शेजारचे शेतकरी मात्र हिंगणी येथील रहिवाशी असलेले आरोपी ज्योती हरिभाऊ पवार,कृष्णा कल्याणी,शिवानी पवार रा.हिंगणी हे त्यांच्या ट्रॅक्टरला आडवे येऊन त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली व दमदाटी केली व नांगरट करण्यास मज्जाव केला आहे.यावरून दोन्ही गटात बेबनाव झाला व फिर्यादी भाऊराव माकूणे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.५६३/२०२० भा.द.वि.कलम ३४१,४४७,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.बी.बाबर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close