जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुकागुन्हे विषयक

कोपरगाव पोलिसांची जुगारींवर वक्र दृष्टी,एकावर गुन्हा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या ईशानेन्स हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेशन रोड नजीक कडेला आरोपी विजय रोहिदास चव्हाण (वय-४४) रा.औद्योगिक वसाहत परिसरात पत्यांचा जुगार खेळ खेळताना कोपरगाव शहर पोलिसांना आढळून आला आहे.

त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने जुगार खेळणाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्र जुगार कायदा प्रतिबंधक कलमान्वये जुगार खेळणे कायद्याने प्रतिबंध केलेला असताना काही नागरिक अतिरिक्त पैशाचा मोह धरून जुगार खेळून आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीत आणीत असतात.असाच एक नमुना कोपरगाव शहर पोलिसांना आढळून आला असून दि.२४ डिसेंबर रोजी दुपारी ३.१० वाजेच्या सुमारास तो कोपरगाव औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याच्या कडेला आडोशाचा आधार घेऊन हे पत्यांचा जुगार खेळताना आढळून आला आहे.

त्याला रंगेहात पकडून त्याच्या कडिल रुपये २१० रुपये रोख व आकड्यांचा सट्टा,जुगार,हार जितीचा जुगार खेळताना आढळून आला आहे.

या बाबत फिर्यादी पो.कॉ.प्रकाश बाबुराव कुंढारे (वय-३३) यांनी आरोपी विजय रोहिदास चव्हाण याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठण्यात गु.र.क्रं.८५३/२०२० महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close