जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दगडफेकीतील ‘ते’आरोपी पाच महिन्यांनी जेरबंद,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात वाळूचोरी करून फरार होत असताना मुर्शतपूर येथे वाळू उपसा प्रतिबंधक पथकाने कारवाई केली असता त्यातील अज्ञात आरोपीनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून फरार असलेले आरोपी कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यात विठ्ठल वामन गायकवाड,(वय-२२) रा.मनाई वस्ती संवत्सर,अमोल वसंत मांडगे रा.महादेव नगर,विजय नारायण मोरे,(वय-३५) रा.बदापुर,सचिन सुभाष जाधव (वय-३५) रा.इंदिरानगर,अर्जुन निंबा देसले (वय-२६)जेऊर पाटोदा आदी पाच आरोपी निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्यांना पाच महिन्यांनी जेरबंद केले आहे.


दरम्यान या वाळूचोरी व तलाठी पथकावर केलेल्या दगडफेकीतील हे आरोपी कोण होते याची खबर पोलिसांना लागली होती.मात्र ते पाच आरोपी शहर पोलिसांना चकवा देत होते.मात्र पोलिसांनी चिकाटी सोडली नाही.व एक एकास जेरबंद करण्यास यश मिळवले आहे.व सर्व पाचही आरोपींना जेरबंद केले आहे.त्यांना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरु असल्याची खबर वाळू उपसा प्रतिबंधक पथकास मिळाली होती.त्यानुसार पथकाचे सदस्य व काकडीचे तत्कालीन कामगार तलाठी फिर्यादी बाळू फकिरा कोळगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींना दि.२७ जानेवारी २०२२ मुर्शतपुर वीट भट्टीजवळ दुपारी १.३० च्या सुमारास घेरले होते.आरोपी हे अवैधरित्या वरील ट्रॅक्टरच्या सहाय्याने गौण खनिज भरून जात असताना त्यांना फिर्यादी तलाठी व त्यांचे साक्षीदार यांनी त्यांना अडवून कायदेशीर कारवाईसाठी घेऊन जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडी वर दगडफेक,शिवीगाळ करून गाडीची मागील काच फोडून जीवे मारण्याची धमकी देऊन करून फरार झाले होते.मात्र हे आरोपी नेमके कोण हे निष्पन्न झाले नव्हते.त्यामुळे हे आरोपी गुन्हा करून आरोपी आतापर्यंत अज्ञात राहिले होते.
 
    दरम्यान या घटनेत पथकाने गौण खनिजासह एक निळ्या रंगाचा पॉवर ट्रॅक-४४५ ट्रॅक्टर हिरव्या रंगाच्या ट्रॉलीसह,व एक एच.एफ.डीलक्स मोटारसायकल (एम.एच.१५ एच.डी.७९१९)आदी अवैज जप्त केला होंता. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी तलाठी बाळू कोळगे यांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९/२०२२ भा.द.वि.कलम ३५३,१८६,३७९,३२३,५०४,५०६,४२७,१८८ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत होते.

    दरम्यान पोलीस या आरोपींच्या मागावर होते. दरम्यान हे आरोपी कोण होते याची खबर पोलिसांना लागली होती.मात्र ते पाच आरोपी शहर पोलिसांना चकवा देत होते.मात्र पोलिसांनी चिकाटी सोडली नाही.व एक एकास जेरबंद करण्यास यश मिळवले आहे.व सर्व पाचही आरोपींना जेरबंद केले आहे.

    दरम्यान त्यांना कोपरगाव येथील कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close