गुन्हे विषयक
एक तोळ्याचे मंगळसूत्र लांबवले,शहरात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आणि तालुका पोलिस ठाण्यात नवीन पोलिस अधिकारी आपल्या कर्तव्यावर रुजू झाले असताना दोन भुरट्या चोरट्यांनी दुचाकीवर येत काल रात्री एका महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन घेऊन निवारा कोपरगाव रोडने भरधाव वेगात पोबारा करून पोलिसांना आव्हान दिले आहे.त्यामुळे मधील काळात बऱ्यापैकी बंद झालेल्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे शहरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव शहरात इंदिरापथ रस्त्यावर काल रात्री 8.30 वाजता मंगळसूत्र चोरीची घटना घडली आहे.यातील इंदिरापथ,कोपरगाव येथील रहिवासी फिर्यादी महिला जया दिलीप शर्मा (वय -55) या गोकुळ नगरी येथील खंदक नाल्याजवळील महावितरणच्या विद्युत रोहित्रा समोरील रोडवर समता बाल उद्यान येथुन आपल्या नातवाला घेवुन घराकडे जात असताना समोरुन एका मोटारसायकल वरुन दोन अज्ञात चोरटे यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन घेऊन पोबारा केला आहे.
कोपरगाव शहरात गुन्हेगारी आणि तिचा वाढता आलेख हा कायम चिंतेचा विषय राहिला आहे.वाळूचोर,रेशन चोर,गावठी कट्टे विकणाऱ्या टोळ्या,भ्रष्टाचार आदी प्रश्नांनी जनतेची झोप उडवली आहे.त्यामुळे हा प्रश्न हाताबाहेर गेल्याने कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी मागील उन्हाळी अधिवेशनात हा प्रश्न विधानसभेच्या पटलावर उपस्थित करून मुख्यमंत्री आणि राज्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी शहर आणि तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.मात्र यानंतर काही तरी बदल घडेल अशी आशा निर्माण झाली असताना काल रात्री पुन्हा भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले आहे.सायंकाळच्या सुमारास महिला आणि ज्येष्ठ नागरिक जेवणानंतर शत पावली करण्यात बाहेर पडतात याची नेमकी संधी साधत भुरटे चोरटे आपली हात सफाई दाखवून जेष्ठ नागरिक आणि महिलांना वेठीस धरतात.अशीच एक घटना काल रात्री 8.30 वाजता घडली आहे.यातील इंदिरापथ,कोपरगाव येथील रहिवासी फिर्यादी महिला जया दिलीप शर्मा (वय -55) या गोकुळ नगरी येथील खंदक नाल्याजवळील महावितरणच्या विद्युत रोहित्रा समोरील रोडवर समता बाल उद्यान येथुन आपल्या नातवाला घेवुन घराकडे जात असताना समोरुन एका मोटारसायकल वरुन दोन अज्ञात चोरटे यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने ओढुन घेऊन निवारा कोपरगाव रोडने भरधाव वेगात निघुन पोबारा केला आहे.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान त्यांनी याबाबत बराच आरडाओरडा केला असता त्याचा काहीही उपयोग झाला नाही.चोरट्यांनी बजाज पल्सर गाडीचा वेगावर स्वार होऊन पोबारा केला आहे.त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड गेले आहे.दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली असता शिर्डी उपविभागाचे पोलिस अधिकारी अमोल भारती,पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे
यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी जया शर्मा यांनी गुन्हा नोंदणी क्रं.-383/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम कलम 309 (4), 3 (5) प्रमाणे दोन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान पुढील तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल पी.डी.सोनवणे हे करीत आहेत.



