जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

..या शहरात मोठी घरफोडी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात दि.१२ जून रोजी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी चोरी केली आहे.या घटनांमध्ये रोख रक्कम,सोन्याचे दागिने आणि चांदीचा ऐवज लंपास करण्यात आला असताना आता कोपरगाव शहरात आणखी एक चोरीची घटना उघडकीस आली असून यात गौरव राम पवार (वय-३० वर्षे)  हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी असताना त्यांचे घराचे कुलूप तोडून झालेल्या चोरीत 3.26 लाखांचा अवैज चोरट्यांनी लंपास केला असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात अवैध धंदे आणि शहरात उपद्रवी ठरणाऱ्या असामाजिक घटनांची थेट मिरवणूक काढून पोलिसांनी त्यांचा चांगलाच पाहुणचार घडवला असून त्यातून त्यांना चांगलीच अद्दल घडवली असताना आता पोलिसांपुढे दुसरीच डोकेदुखी निर्माण झाली आहे.अनेक हवामान खात्याच्या तज्ञांनी यावर्षी पाऊस कमी पडणार असल्याचे सूतोवाच केले असताना त्याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली असल्याचे दिसू लागले आहे.कारण चोरट्यांनी आता आपल्या हाताची चलाखी दाखवण्यास सुरुवात केली आहे.यातील पहिली चुणूक चोरट्यांनी सोनेवाडी येथील अनेक ग्रामस्थांना दाखवून दिली आहे.त्यानंतर आता कोपरगावकडे त्यांची वक्रदृष्टी पडली असल्याचे दिसून येत आहे.अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.यातील फिर्यादी इसम गौरव पवार यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे.त्यामुळे यांचे घरात कायम रोकड असते.या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी दिनाक 13 जून रोजी ही कुटुंब घराबाहेर गेले असल्याची संधी साधून घरावर पाळत ठेवून मोठी चोरी केली असल्याचे उघडकीस आले आहे.ते आपल्या काम आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी घरी आले असता सायंकाळी ०५ वाजण्याचे सुमारास दरवाजाला बसविलेले सेप्टी डोअरचा लॉक तुटलेले दिसले.त्यानंतर ते आणि त्यांची पत्नी आदींनी  दरवाजा उघडुन घरात जाऊन पाहीले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले होते.बेडरुम मधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सामान बाहेर काढुन ऊचकापाचक झालेली दिसली होती.त्यात २ दोन लाख 25 हजार रुपये रोख रक्कम (त्यामध्ये ५०० रुपये दराच्या नोटा) ६० हजार रुपये किंमतीची १ तोळा ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन( साखळीत असलेली जुनी वापरती),या शिवाय ३० हजार रुपये किंमतीची ३ कानातील जोड (७ ग्रॅम वजनाचे जुने वापरते), ४ हजार रुपये किंमतीचे जोडवे (६ भार वजानाचे) २ हजार रुपये किंमतीचे चांदीचा करंडा,२ हजार रुपये किंमतीची दोन भार वजनाचा चांदीचा छल्ला,(जुना वापरता),३ हजार रुपये किंमतीचे ८ भार वजनाचे चांदीच्या पट्या असा एकूण ३ लाख २६ हजार रुपये किंमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा अवैज चोरट्यांनी फिर्यादीच्या संमती शिवाय चोरून नेला आहे.याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

   दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धान्येनेश्वर सोनवणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close