गुन्हे विषयक
दोन विद्यार्थी गटात हाणामारी,चार जणांविरुद्ध गुन्हा
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
मूळ येवला तालुक्यातील भारम कोळंब येथील रहिवासी मात्र वर्तमानात कोपरगाव शहरात उच्च शिक्षण घेत असलेल्या फिर्यादीस दीड वर्षा पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शिंगणापूर येथील आरोपी संजय एखंडे,किरण महाजन,अक्षय भोसले,सूरज बागुल आदी चार जणांनी मारहाण केली असून त्यांचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी विद्यार्थी नारायण पोपट आवारे (वय-२०) याने गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी नारायण आवारे हा दिनाक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ‘साईतिथी कॉम्प्लेक्स’ या ठिकाणी अभी कासार याचे टपरी जवळून आपला जेवणाचा डबा आणण्यास गेला असताना आरोपी संजय एखंडे,किरण महाजन,अक्षय भोसले,सूरज बागुल आदी चार जणांनी फिर्यादीवर हल्ला केला आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था बिघडली असून त्याबाबत नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा उहापोह झाला आहे.आता वर्तमानात लोकप्रतिनिधींची दुसरे सत्र सुरू होत असल्याने याबाबत सुधारण होणे अपेक्षित आहे.मात्र त्याला नुकतेच गालबोट लागले असल्याचे दिसून आले आहे.याबाबत येवला तालुक्यातील भारंब-कोळब येथील मूळ रहिवासी असलेला विद्यार्थी नारायण आवारे हा कोपरगाव येथे उच्च शिक्षण घेत आहे.त्याचे व आरोपीचे दीड वर्षापूर्वी किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती.मात्र ती त्यावेळी मिटली होती.मात्र त्यानंतर आरोपी आणि त्यांच्यात वाद नुकताच उफाळून आला आहे.फिर्यादी नारायण आवारे हा दिनाक ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ‘साईतिथी कॉम्प्लेक्स’ या ठिकाणी अभी कासार याचे टपरी जवळून आपला जेवणाचा डबा आणण्यास गेला असताना आरोपी संजय एखंडे,किरण महाजन,अक्षय भोसले,सूरज बागुल आदी चार जणांनी फिर्यादी यास चॉपरने फिर्यादीत डाव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले आहे व हाताचे चापटीने फिर्यादी तरुणास मारहाण केली आहे.तर त्याचा मित्र महेश भैराट यास वीट फेकून मारली आहे.दरम्यान फिर्यादी विद्यार्थी नारायण पोपट आवारे याने शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपी विरुध्द दाखल केला आहे.मात्र भांडणाचे मूळ कारण समजू शकले नाही.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी यातील अक्षय भोसले व सूरज बागुल या दोन जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक हांडोरे यांनी आमच्या प्रतिनिधी दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक-५३२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११८(२)११५ (२),३५२,३(५) प्रमाणे चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हांडोरे,शेळके आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे करीत आहेत.