गुन्हे विषयक
चोरट्यांनीं मारला डल्ला,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा विद्युत पंपांच्या चोरीचे सत्र सुरु झाले असून सुरेगाव हद्दीत रहिवासी असलेले शेतकरी मोतीराम दिनकर निकम यांचेसह सांगवी भुसार हद्दीतील शेतकरी निवृत्ती गजाजन चुनाळे,अंबादास शिवराम आरोटे,बाजीराव बाबुराव आरोटे आदींच्या शेतातील विहिरीत बसवलेले विद्युत पंप अज्ञात चोरट्यानी काढून त्यातील तांब्यांची तार चोरून नेली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांत खळबळ उडाली आहे.


वर्तमानात रब्बी हंगाम संपला असून शेतकऱ्यांची पिके निघून गेली आहे तर काही शेतकऱ्यांची अद्याप बाकी असून त्यांचे शेतातील कडक उन्हाळ्याने शेतात जाणे-येणे कमी झाले असल्याने चोरट्याने आयतीच संधी चालत आली असून त्यातून त्यांनी आपला मोर्चा शेतातील विहिरीतील विद्युत पंपावर वळवला असून अशी घटना नुकतीच सुरेगाव,सांगवी भुसार येथे गोदावरी काठी उघड झाली आहे.
याबाबत सुरेगाव येथील शेतकरी मोतीराम निकम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपली शेती सुरेगाव हद्दीत गोदावरी नदी पात्रालगत असून आपल्या शेतात असललेल्या विहिरीत ‘लक्ष्मी’ कंपनीची साडे सात अश्वशक्तीची विद्युत मोटार आपण बसवली होती.मात्र आपले शेतात जाणे-येणे कमी झाल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने सदर विद्युत मोटार विहिरीच्या बाहेर काढून त्यातील ०६ हजार २५० रुपयांची तांब्यांची तार काढून पोबारा केला आहे.
दरम्यान या शिवाय अज्ञात चोरट्यानी आपल्या व युवराज मेहेर खांब यांचे उत्तर दिशेस असलेल्या सांगवी भुसार हद्दीत शेतजमीन असलेले शेतकरी निवृत्ती चुनाळे,अंबादास आरोटे,बाजीराव आरोटे आदींच्या शेतात असलेल्या विहिरीतील मोटारी काढून त्यातील तांब्याच्या तारा काढून पोबारा केला आहे.
दरम्यान त्यावरून तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी नुकताच गुन्हा क्रं. १५९/२०२४ भा.द.वि.कलम ३७९,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.विलास कोकाटे हे करत आहेत.



