जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या देशाच्या धोरणामुळे भारतात वैद्यकीय उपकरणं महाग !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

मुंबईः

पेट्रोलियम नंतर आता आरोग्यसेवेचा खर्च वाढला आहे.दुबळा रुपया,चीनमधली टाळेबंदी आणि तिथल्या सरकारच्या काही धोरणांमुळे आयात वैद्यकीय उपकरणं आणि काही औषधांच्या किमती गेल्या एका वर्षात १२ ते ५५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना याच्या झळा बसणार आहे.

सरकारने या वर्षी फार्मा कंपन्यांना देशी फॉर्म्युलेशनच्या किंमती म्हणजे स्वदेशी विकसित औषधांच्या किमती दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली होती.यामुळे वेदनाशामक आणि प्रतिजैविकांसह हृदयरोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सुमारे आठशे औषधांच्या किमतीत किमान दहा टक्के वाढ झाली आहे.

या वर्षात आतापर्यंत रुपयाचं सुमारे ७.५ टक्के अवमूल्यन झालं आहे.त्यामुळे वैद्यकीय उपकरणांची आयातही जवळपास तितकीच महाग झाली आहे.याव्यतिरिक्त,औषधांचा मुख्य कच्चा माल असलेल्या एपीआयची किंमत १२० टक्क्यांनी वाढली आहे.या सर्वांमध्ये,सरकारने पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाडं असलेल्या नॉन-आयसीयू रुग्णालयाच्या खोल्यांवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे.

‘लोकल सर्कल्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ५२ टक्के लोकांनी सांगितलं की,”त्यांच्या वैद्यकीय खर्चात झपाट्याने वाढ झाली आहे.सर्जिकल उपकरणं आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या किमती १८ टक्क्यांपर्यंत वाढल्या.असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीनुसार, २०२१-२२ मध्ये ६३ हजार दोनशे कोटी रुपयांची वैद्यकीय उपकरणं आयात करण्यात आली.२०२०-२१ मधल्या ४४ हजार ७०८ कोटी रुपयांच्या आयातीपेक्षा हे प्रमाण ४१ टक्के जास्त आहे.

रुपयाच्या घसरणीमुळे शस्त्रक्रिया उपकरणं,ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यांची किंमत १०-१८ टक्के जास्त आहे.एपीआयसारख्या औषधांचा कच्चा माल २०० टक्क्यांनी महागला.केअर एज या रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार,चीनमध्ये कोविडच्या मर्यादांमुळे एपीआयच्या किमती गेल्या १२-१८ महिन्यांमध्ये २५-१२० टक्के वाढल्या आहेत.जिलेटिन,सेल्युलोज,स्टारर्च,सुक्रोज आणि पॉलीथिलीन ग्लायकोल यासारखे एक्सपिएंट्स दोनशे टक्के महाग झाले आहेत. ते औषधी उत्पादनात डोस स्वरूपात वापरले जातात.अँटिबायोटिक्स आणि पेनकिलरच्या किमती वाढल्या आहेत.

सरकारने या वर्षी फार्मा कंपन्यांना देशी फॉर्म्युलेशनच्या किंमती म्हणजे स्वदेशी विकसित औषधांच्या किमती दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली होती.यामुळे वेदनाशामक आणि प्रतिजैविकांसह हृदयरोगावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सुमारे आठशे औषधांच्या किमतीत किमान दहा टक्के वाढ झाली आहे.काही औषधांच्या किमती ५५ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.कारण त्यांच्या उत्पादनामध्ये पीआयसारख्या अधिक आयात केलेला कच्चा माल वापरला जातो.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close