जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावातील…या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लक्षवेधी यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक असलेल्या के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील विजय रहाणे, योगेश काकडे,कु.निकिता वाघ आदी तीन विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवले असून या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याबाबत सविस्तर वृत असे की,”सोमैय्या महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातून नुकतेच एम.एस्सी पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी विजय रहाणे याची युनिव्हर्सिटी ऑफ क्वींसलँड,ऑस्ट्रेलिया व आय.आय.टी नवी दिल्ली यांच्‍या जॉईंट पी.एच.डी. प्रोग्रामसाठी निवड झाली आहे.

“विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चप्रतीचे शिक्षण मिळावे तसेच उच्च शिक्षण पूर्ण करून समाजहितासाठी आपले योगदान द्यावे ही आमची इच्छा आहे,विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रात मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या नावलौकिकात निश्चितच भर पडत आहे”-अशोक रोहमारे,अध्यक्ष,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.

दरम्यान या विभागातील योगेश काकडे या विद्यार्थ्याला स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटी यु.एस.ए.न्यूयॉर्क या विद्यापीठाची पी.एचडी शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.तर रसायनशास्त्र विभागातील कु.निकिता सुनील वाघ या एम.एस्सी च्या विद्यार्थिनीची भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण,नवी दिल्लीच्या वतीने अखिल भारतीय पातळीवर इंटर्नशिप साठी निवड झाली आहे. महाविद्यालयातील तीनही विद्यार्थ्यांनी ध्येय,चिकाटी व अभ्यासाचे सातत्य या त्रिसूत्रीचा प्रयोग करून हे लक्षवेधी यश मिळविलेले आहे.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी याप्रसंगी महाविद्यालयाच्या यशाचा आलेख प्रस्तुत करताना रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा उल्लेख केला तसेच संशोधन क्षेत्रात विभाग करत असलेल्या कार्याचे कौतुक केले आहे.

या प्रसंगी संस्थेचे सचिव अ‍ॅड.संजीव कुलकर्णी व सदस्य संदीप रोहमारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या तीनही विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.बी.काळे,डॉ.एन.आर. दळवी,डॉ.एन.टी.ढोकळे,डॉ.एस.जी.कोंडा,प्रा.एस.एस.नागरे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close