आरोग्य
श्री.सद्गुरू गंगागिरीजी महाविद्यालयात कोविड लसीकरण
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्री सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात मोफत कोरोना लसीकरण शिबीर मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ तसेच राष्ट्रीय छात्र सेना,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे.
करोना संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे.अनेक राज्यांनी तर मोफत लसीकरण सुरू केलंय.केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.या पार्श्वभूमीवर महाविद्याल्याने हे लसीकरण सुरु केले आहे.
लसीकरण शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर थोपटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. लसीकरण शिबीर यशस्वी होण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र,कोपरगाव येथील आरोग्य सेविका श्रीमती नंदू नवले,आरोग्य कर्मचारी कर्मचारी विजया दुशिंग,मीरा पवार,दीपक जाधव यांच्यासह डॉ.चंद्रभान चौधरी,प्रा.शोभा दिघे,प्रा.एम.के.दिघे,प्रा.डॉ.सुरेश काळे,प्रा.अमोल चंदनशिवे,प्रा.डॉ.बी.एम.वाघमोडे यांचे सहकार्य लाभले आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अरुण देशमुख,डॉ.सुभाष रणधीर,डॉ.विजय निकम,ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.रामभाऊ गमे,रजिस्टार सुनील ठोंबरे,अधीक्षक सुनील गोसावी आदिंसह सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.