जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नवविवाहितेची आत्महत्या,कोपरगावात गुन्हा दाखल !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या जयश्री विक्रम गुंजाळ (वय-२१) या मुखेड येथील नवविवाहित तरुणीचे केवळ आठ महिन्यात शव त्यांच्या नजीकच्या स्वतःच्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेचे पिता बाबासाहेब नथु आहेर (वय-५८) रा.प्रवरानगर यांनी या बाबत पोलिसात हुंड्यासाठी आपल्या मुलीचा बळी घेतला असावा असा संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली आहे.व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

संकल्पित छायाचित्र

दरम्यान सदर तरुणी हि किराणा व्यावसायिक नवरा विक्रम गुंजाळ यांस मदत करत होती.काल दिवसभर ते दोघे बरोबर होते.मात्र काल सायंकाळी तिने आपल्या भावाला एक लघु संदेश पाठवला होता.व त्यात तिने आपल्या भावाला लिहिलेल्या संदेशात नवरा,सासू,व सासरा या तिघांना सोडू नका असा संदेश पाठवला होता अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे.माहेराहून पाच तोळे सोने आणावे या हुंड्याच्या कारणावरून बेबनाव होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे.यातून या महिलेने हे पाऊल उचलले असावे असे समजते.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत नवं विवाहित तरुणी जयश्री गुंजाळ रा.मुखेड वडील नोकरी निमित्त प्रवरा नगर येथे आहेत.हिचे लग्न आठ महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील किराणा व्यावसायिक विक्रम गुंजाळ याचेशी झाला होता.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर दोघांत काही माहेराहून पाच तोळे सोने आणावे या कारणावरून घरात नवरा,सासू,सासरे यांच्यात कुरबुरी सुरु झाल्या होत्या.

दरम्यान आज सकाळी संबधीत महिला गायब झाल्यावर प्रथम कोपरगाव तालुका पोलिसांना व मयत तरुणीच्या नातेवाईकांना याची खबर दिली होती.नातेवाईक आल्यावर वातावरण चिघळण्यास प्रारंभ झाल्यावर हि सर्व मंडळी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.ती सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घराच्या ती सौचास जाते म्हणून बाहेर पडली होती.त्या नंतर सकाळी घरातील नातेवाईकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला असता ती विहिरीत मिळून आली नाही.मात्र वस्तीनजीक साधारण ५०० फुटावर असलेल्या ग.क्रं.४९ मध्ये ते शोधण्यास गेले असता त्या विहिरीजवळ असलेल्या झाडावर तिने बरोबर नेलेली विजेरी दिसून आली त्यातून ती त्या संशयावरून ती त्याच विहिरीत असावी असा तीच्या घरच्यांचा संशय बळावला होता.त्या ठिकाणी शोध घेतला असता ती त्या विहिरीत मिळून आली आहे.नजीकचे नागरिक व भाऊ,वडील,काका आदी नातेवाईकांना महिलेचे शव नजीकच्या विहिरीत आढळून आले होते.तिला गळाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान सदर तरुणी हि किराणा व्यावसायिक नवरा विक्रम गुंजाळ यांस मदत करत होती.काल दिवसभर दिवाळीची किराणा ग्राहकांची गर्दी असल्याने गडबड असल्याने ते दोघे बरोबर होते.मात्र काळ सायंकाळी तिने आपल्या भावाला एक लघु संदेश पाठवला होता.व त्यात तिने आपल्या भावाला लिहिलेल्या संदेशात नवरा,सासू,व सासरा या तिघांना सोडू नका असा संदेश पाठवला होता अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे.मात्र सासू व नवरा यांच्यात माहेराहून पाच तोळे सोने आणावे,लग्न साधेपणाने केले,संसारोपयोगी साहित्य दिले नाही,या कारणावरून शारीरिक,मानसिक छळ केलाच होता.त्यातून हिघटना घडून आली आहे.अशी फिर्यादी मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.त्याला पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुजोरा दिला आहे.घटनास्थळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव,पोलिस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी नवरा विक्रम गुंजाळ,सासू नंदाबाई उर्फ अलका राजेंद्र गुंजाळ,सासरा राजेंद्र हरिभाऊ गुंजाळ यांचे विरुद्ध गु.र.क्रं.३७३/२०२१ हुंडा बळी कलम ३०४ (ब),४९८(अ),५०४,३४ प्रमाणे केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाययक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close