जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दिव्यांगांना मोफत वस्तू वाटप कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ व फेलोशिप ऑफ दि फिजिकल हॅन्डीकॅप्ड,मुंबई व मनसे दिव्यांग सेना यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग नागरिकांना साधनांचे मोफत वाटप आ.काळे यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

दिनांक २७ मार्च २००२ रोजी महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली.अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.त्यातच काही सामाजिक संस्था दिव्यांगांना मदत करत असतात.अशीच घटना कोपरगावात घडली आहे.

महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे,समाजातील दुर्बल,दुर्लक्षित अपंगांच्या जीवनातील अंधःकार दूर करून त्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणावे या उद्देश्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ डिसेंबर २००१ रोजी,जागतिक अपंग दिनाचा मुहूर्त साधून,महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्याचा शासन निर्णय जारी केला.त्याप्रमाणे कंपनी अधिनियम १९५६ नुसार दिनांक २७ मार्च २००२ रोजी महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली.अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.त्यातच काही सामाजिक संस्था दिव्यांगांना मदत करत असतात.अशीच घटना कोपरगावात घडली आहे.कोपरगावात या पूर्वी फेलोशिप ऑफ दि फिजिकल हॅन्डीकॅप्ड,मुंबई व मनसे दिव्यांग सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अपंग नागरिकांचे शिबिर गत महिन्यात आयोजित करण्यात आले होते.त्यात ज्या दिव्यांग नागरिकांना जी आवश्यक साधने आवश्यक आहे त्याची नोंद करण्यात आली होती.व त्यानंतर आज आयोजित केलेल्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होतेत्यात या वस्तूचे वाटप करण्यात आले आहे.यात काही कार्यभाग कर्मवीर काळे मित्र मंडळाने उचलला आहे.सदर प्रसंगी फेलोशिप ऑफ दि फिजिकल हॅन्डीकॅप्ड, मुंबईचे मानद सचिव विलास कोलगावकर,जनरल मॅनेजर अत्रीनंदन ढोरमारे,कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण,मनसे दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाक रोहोम,संचालक पद्माकांत कुदळे,राहुल रोहमारे,पंचायत समिती सदस्य अनिलज कदम,मधुकर टेके,दिलीप दाणे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल,मंदार पहाडे,संदीप पगारे,मेहमूद सय्यद,प्रतिभा शिलेदार,सुनील फंड,माधवी वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,माजी नगरसेवक रमेश गवळी,कृष्णा आढाव,दिनकर खरे,मनसे दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, योगेश गंगवाल, भाऊसाहेब पारखे, संजय गिते, अतुल गुरसळ, नारायण कटेकर, सुनील फंड, राजेंद्र थोरात आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.कोपरगाव मतदार संघातील दिव्यांग नागरिकांना आवश्यक असलेल्या साधनांची नोंदणी करून ते साहित्य आ.काळे यांच्या हस्ते २०० दिव्यांग बांधवांना १० लक्ष रुपये किमतीचे कृत्रिम साधने यामध्ये व्हीलचेअर, वॉकर, तीन चाकी सायकल,वॉकिंग स्टिक,ट्रायपॅॉड,कॉड्रीपॉड,स्लीपर चेअर,अॅल्युमिनियम क्रचेस,फोल्डिंग वॉकर,एलबो क्रचेस,कृत्रिम पाय,कॅलीफर आदी वस्तूंचे वाटप मोफत देण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्तविक योगेश गॅंगवाल यांनी केले तर सुत्रसंचलन राजेंद्र वाकचौरे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन आ.काळे,फेलोशिप ऑफ दि फिजिकल हॅन्डीकॅप्ड,मुंबईचे मानद सचिव विलास कोलगावकर,जनरल मॅनेजर अत्रीनंदन ढोरमारे यांनी केले तर उपस्थियितांचे आभार कोपरगाव नगरपरिषद गटनेते विरेन बोरावके यांनी मानले आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसे दिव्यांग सेनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पारखे,सतीश कानडे,संजय गीते,मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,आदींनी योगदान दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close