कोपरगाव शहर वृत्त
…या शहरात,भारत संकल्प यात्रे’चे आयोजन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात उद्या दि.२६ डिसेंबर रोजी केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने फ्लॅग शिप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यां पर्यंत पोहचवावे यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी दिली आहे.

“विकास भारत संकल्प यात्रा माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. मी जे काही बोललो, मी जे काही केले ते सर्व मला हवे होते तसे झाले आहे का? ज्यांच्यासाठी ते केलं तो हेतू साध्य झाला आहे का? हे मला मोजायचे आहे,” असं मत मोदींनी व्यक्त केलं. तसेच विकास भारत संकल्प यात्रा हे एक मोठे स्वप्न आहे, एक मोठा संकल्प आहे आणि हा संकल्प आपण स्वतःच्या प्रयत्नाने पूर्ण केला पाहिजे”-नरेन्द्र मोदी,पंतप्रधान.
विकसित भारत संकल्प यात्रा हा एक सरकारी उपक्रम आहे.आयुष्मान भारत,उज्ज्वला योजना,पी.एम सुरक्षा विमा, पी.एम.स्वनिधी इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम दि.२६ व २७ डिसेंबर रोजी कोपरगाव शहरात मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय मैदान या ठिकाणी राबवण्यात येत आहे.
तर बुधवार दि.२७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तुळजा भवानी मंदिर परिसरात विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न होत आहे.त्यासाठी नागरिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांनी शेवटी केले आहे.