जाहिरात-9423439946
निवड

…या डॉक्टरांची आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरुपदी नियुक्ती !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

भारत सरकारच्या आयुष मंत्रालय संचालित राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्ली तर्फे पुन्हा सलग आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ् डॉ.रामदास म्हाळूजी आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आलीआहे त्यांच्या नियुक्तीबाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे.आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी,आहार विषयक नियम,व्यायामाचे विविध प्रकार,आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.त्यात कोपरगावचे नाव डॉ.रामदास आव्हाड यांनी उज्वल केले आहे.त्यांना नुकताच आठव्यांदा गुरुपदाचा सन्मान मिळाला आहे.

आयुर्वेदाची सुरुवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते.आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते.आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे.आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी,वनस्पतीजन्य औषधी,आहार विषयक नियम,व्यायामाचे विविध प्रकार,आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो.त्यात कोपरगावचे नाव डॉ.रामदास आव्हाड यांनी उज्वल केले आहे.त्यांना नुकताच आठव्यांदा गुरुपदाचा सन्मान मिळाला आहे.

सन-२०१० पासून ते या पदावर कार्यरत असून आजपर्यंत हजारोंच्या वर आयुर्वेद पदवीधर त्यांचे कोपरगाव येथील धन्वंतरी आयुर्वेद रुग्णालयातून पंचकर्म ट्रेनिंग घेऊन भारतभर आयुर्वेदाद्वारे यशस्वी रुग्ण सेवा करत आहेत.आयुर्वेद डॉक्टरांचीची राष्ट्रीय पातळीवर परीक्षा घेतली जाते व त्यातील उत्तीर्ण वैद्यकांना क्रमवारीनुसार भारतातून निवडलेल्या सत्तर वैद्याकडे वर्षभर राहून शिकण्याची संधी मिळते.त्याबद्दल त्यांना मासिक पन्नास हजार रुपये एवढे मानधन सरकार कडून दिले जाते.याव्यतिरिक्त आयुर्वेदातील एम.डी.झालेले नवीन वैद्यकही प्रत्यक्ष कर्म शिकण्यासाठी कोपरगाव येथे गर्दी करत असतात.कोपरगाव येथे शिकण्यास येण्याची हजाराहून अधिक असलेली विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी डॉ.रामदास आव्हाड यांच्या अनुभवाची साक्ष देत आहे.

मागील वर्षी त्यांनी जंगली महाराज आश्रम येथे देश पातळवीर आयुर्वेद अधिवेशन यशस्वी आयोजन करून आयुर्वेद विश्वात सन्मान मिळवला होता.महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन अध्यक्ष म्हणून त्यांनी आठ वर्ष केलेल्या कामगिरीची दखल घेत नुकतीच त्यांची भारतातील सर्वात जुन्या असलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन च्या केंद्रीय संघटन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

डॉ.आव्हाड यांचे सहकारी श्रीरामपूर येथील डॉ.सतीश भट्टड यांची नुकतीच नव्याने राष्ट्रीय गुरु म्हणून नियुक्ती झाली होते.एका जिल्ह्यात एक पेक्षा अधिक गुरु कुठेही नसल्याने नगर जिल्ह्यातील दोन वैद्यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण भारत देशातील एकमेव उदाहरण ठरले असल्याचे मानले जात आहे.डॉ.रामदास आव्हाड यांच्या ग्रामीण भागात राहून करत असलेल्या कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणे हे कोपरगावसाठी गौरवास्पद आहे मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close