जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

बचत गटाच्या महिलांनी कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून कुटुंबाचा आर्थिक भार हलका केला असून त्यांच्या जिद्द व चिकाटीतून आज अनेक महिलांनी उद्योग जगतात वेगळा ठसा उमटविला असल्याचे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“गत अडीच वर्षात कोरोना संकटाचा सामना करीत असताना त्याचा सर्वच घटकांना मोठा फटका बसला होता. बचत गटाच्या महिला करीत असलेल्या गृह उद्योगावर देखील काही अंशी परिणाम झाला आहे.त्यामुळे यातून सावरण्यासाठी पुन्हा उभारी घेवून बचत गटाच्या महिलांना उभारी देण्यासाठी घरबसल्या करता येणाऱ्या उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन देण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे”-पुष्पां काळे,अध्यक्षा,प्रियदर्शनी महिला मंडळ.

महाराष्ट्र शासन-कृषी विभाग आत्मा अंतर्गत महिलांसाठी शेळी दूध व दुग्ध व्यवस्थापन प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच टाकळी येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला याप्रसंगी त्या बोलत होत्या.

सदर प्रसंगी भाऊसाहेब देवकर,बाळासाहेब देवकर,सुरेश देवकर,शशिकांत देवकर,गोरख देवकर, सनी आव्हाड,बाळासाहेब पाईक,संभाजीराव देवकर,रंजना देवकर,भारती देवकर,कविता नांगरे, स्नेहल देवकर,अंजना कुलटे,स्वाती देवकर,मंगल देवकर,प्रतिभा देवकर आदींसह बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की,”बचत गटाच्या महिलांना घरगुती छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करून पतपुरवठा करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ मदत करीत आहे. मागील दोन वर्षापासून आपण जीवघेण्या कोरोना संकटाचा सामना करीत होतो.त्यामुळे सर्वच घटकांना याचा मोठा फटका बसला असून बचत गटाच्या महिला करीत असलेल्या गृह उद्योगावर देखील काही अंशी परिणाम झाला आहे.त्यामुळे यातून सावरण्यासाठी पुन्हा उभारी घेवून बचत गटाच्या महिलांना उभारी देण्यासाठी घरबसल्या करता येणाऱ्या उद्योग व्यवसायाचे मार्गदर्शन देण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.महिलांनी या संधीचा फायदा घेवून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन सौ.काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close