जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना रुग्णांची किंचित वाढ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात हि वाढ आता कमी अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४७६ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०३ रुग्ण बाधित आढळले असून ४७३ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ५६० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०६ तर अँटीजन तपासणीत ०३ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०५ असे एकूण अहवालात बरीच वाढ होऊन एकूण १४ रुग्ण अनेक महिन्यात किमान पातळीवर पहिल्यांदा बाधित आढळले आहे.तर १६ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहर व तालुक्यात एकाचाही मृत्यू नोंदवला गेला नाही.तथापि कोरोना रुग्णांत लक्षणीयरीत्या कमी आली आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १३ हजार ५४८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ११७ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २१४ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५८ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०१ लाख ४९ हजार ११० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०५ लाख ९६ हजार ४४० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०९.०९ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १३ हजार २१७ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.५६ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ०२ हजार ७०७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ९६३ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ९१ हजार ३२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ४१६ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून राज्याने आता पुन्हा एकदा निर्बंध उठवले आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास प्रारंभ केला आहे.कोरोना रुग्ण काही अंशी पुन्हा वाढु लागले होते मात्र पावसाने सुरुवात केल्याने हे प्रमाण घटल्याचे मानले जाते.अन्य ठिकाणी ते जिल्ह्यात वाढताना दिसत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close