जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील ‘त्या’आरोपींना २५ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी,आणखी आरोपी जेरबंद

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

“शिर्डी शहर किती कि.मी.आहे” असे विचारण्याचा बहाणा करून येसगाव भास्कर वस्ती येथे मध्य रात्रीच्या सुमारास थांबवून आरोपी विशाल शशिकांत अहिरे,रा. शिर्डी,सागर शिवाजी काळे (वय-२०) रा.येवला,सागर उर्फ गणेश शिवाजी साबळे रा.मनमाड यांनी श्रीराम फायनान्स कंपनीतील फिर्यादी सुमित शिंदे यांस दगडाने मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम १६ हजार ४०० रुपये लुटून नेल्या प्रकरणातील आरोपींना आज कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री शेख यांचे समोर हजर केले असता त्यांनी आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुंह्यातील फरार आरोपी यास पोलिसानी मनमाड मध्ये जाऊन जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.दरम्यान या गुंह्यातील आधी अटक आरोपीनी आपली खरी नावे लपवली असल्याचे निष्पन्न झाले आहे.व त्यांच्यावर शिर्डी-राहाता परिसरात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.

दरम्यान अटक केलेले आरोपिंना आज सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री शेख यांच्यासमोर हजर केले असता अटक आरोपी यांना दि.२५ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान आरोपीनी आपली खरी नावे लपवली असल्याचे धक्कादायक रित्या समोर आले आहे.मात्र पोलिसांनी कागदपत्रांच्या आधारे त्यांची खरी ओळख उघड केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सुमित शिंदे हे येवला येथील श्रीराम फायनास कंपनीत नोकरीस असून कर्ज वसुली करण्याचे काम करतात.ते दि.शनिवार दि.२१ ऑगष्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आपले कर्तव्य आटोपून आपल्या घरी येत असताना नगर-मनमाड रोडवर येसगाव ग्रामपंचायत हद्दीत भास्कर वस्तीजवळ सुनसान रस्ता हेरून त्यांना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकी स्वारांनी हटकवले व त्यांना विचारणा करून,”शिर्डी येथून किती कि. मी.आहे.” असे म्हणून त्यांना बोलण्याच्या नादी लावून त्यांच्या गाडीचा वेग कमी करून त्यांना गाडी थांबविण्यास भाग पाडले व फिर्यादी सुमित शिंदे यांच्या पाठीवरील रोख रकमेची पिशवी त्यांनी हिसकावून घेतली.त्यांनी विरोध सुरु केला असता त्यांना दगड फेकून मारहाण करून पोबारा करत असताना या घटनेचा आरडा-ओरडा ऐकून नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील दोन आरोपींना जेरबंद केले होते.व कोपरगाव तालुका पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले होते.त्या वेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन यातील दोन आरोपीं सागर शिवाजी काळे व दुसरा आरोपी विशाल आहिरे यास अटक केली होती.व या तिन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

आरोपी क्रमांक एक विशाल शशिकांत अहिरे याच्या खऱ्या नावाचा आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात शोध घेतला असता ‘तो’ शिर्डी येथील रहिवासी असून तो सौंदाडे बाबा मंदिराचे मागील बाजूचा रहिवासी आहे.व त्याचे खरे नाव विकी बबन लांडगे असे व तो फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दरम्यान तिसरा आरोपी सागर शिवाजी साबळे हा मनमाड येथील असून त्याचा पोलिसानी शोध घेतला असता तो हुडको २००० येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याचे खरे नाव आरोपीनी लपवले होते.त्यात तपासात त्याचे खरे नाव सागर बाळू साबळे असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्याच्या अटकेची खबर त्याची पत्नी हिना सागर साबळे हिला दिली आहे.दरम्यान आरोपीनी गुन्ह्यात वापरली दुचाकी हि अद्याप सापडलेली नाही.तीचा पोलीस शोध घेत आहे.दरम्यान या आरोपींनीं आणखी गुन्हे उजेडात येण्याची शक्यता तालुका पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान अटक केलेले आरोपिंना आज सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री शेख यांच्यासमोर हजर केले असता अटक आरोपी यांना दि.२५ ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.आरोपींच्या वतीने अड्.नितीन गंगावणे यांनी तर सरकारी पक्षाच्या वतीने अड्.सोमनाथ व्यवहारे यांनी काम पहिले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close