गुन्हे विषयक
फायनास कंपनीच्या कर्मचाऱ्यास लुटले,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी शहर किती कि.मी.आहे असे विचारण्याचा बहाणा करून आपली दुचाकी भास्कर वस्ती येसगाव येथे रात्री १२ वाजेच्या सुमारास थांबवून आरोपी विशाल शशिकांत अहिरे,रा. शिर्डी,सागर शिवाजी काळे (वय-२०) रा.येवला,सागर उर्फ गणेश शिवाजी साबळे रा.मनमाड यांनी दगडाने मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम १६ हजार ४०० रुपये लुटून नेली असल्याचा गुन्हा येवला येथील श्रीराम फायनास कंपनीचा कर्मचारी फिर्यादी सुमित विजय शिंदे (वय-२७) रा.गजानन नगर कोपरगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या झटापटीत फिर्यादी गंभीर रित्या जखमी झाला आहे.
फिर्यादी सुमित शिंदे हे आपल्या घरी येत असताना नगर-मनमाड रोडवर येसगाव ग्रामपंचायत हद्दीत भास्कर वस्तीजवळ सुनसान रस्ता हेरून त्यांना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वारांनी हटकवले व त्यांना विचारणा करून,”शिर्डी येथून किती कि. मी.आहे.” त्यांना बोलण्याच्या नादी लावून त्यांच्या गाडीचा वेग कमी करून त्यांना गाडी थांबविण्यास भाग पाडले व फिर्यादी सुमित शिंदे यांच्या पाठीवरील पिशवी त्यांनी हिसकावून घेवुन पोबारा केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे येवला येथील श्रीराम फायनास कंपनीत नोकरीस असून कर्ज वसुली करण्याचे काम करतात.ते दि.शनिवार दि.२१ ऑगष्ट रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास आपले कर्तव्य आटोपून आपल्या घरी येत असताना नगर-मनमाड रोडवर येसगाव ग्रामपंचायत हद्दीत भास्कर वस्तीजवळ सुनसान रस्ता हेरून त्यांना पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वारांनी हटकवले व त्यांना विचारणा करून,”शिर्डी येथून किती कि. मी.आहे.” त्यांना बोलण्याच्या नादी लावून त्यांच्या गाडीचा वेग कमी करून त्यांना गाडी थांबविण्यास भाग पाडले व फिर्यादी सुमित शिंदे यांच्या पाठीवरील पिशवी त्यांनी हिसकावून घेतली त्यांनी विरोध सुरु केला असता त्यांना दगड फेकून मारहाण करून पोबारा केला आहे.या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली असून अज्ञात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाल करून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.या गुन्ह्यात तीन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यात शिर्डी येथील सौन्दाडे बाबा मंदिराच्या पाठीमागील शिर्डी येथील आरोपी विशाल अहिरे,दुसरा आरोपी हा सागर काळे हा फत्तेपुर नाका गंगा दरवाजा जवळ येवला येथील आहे.तर तिसरा आरोपी हा सागर उर्फ गणेश साबळे हा ५२ नंबर गल्ली मनमाड येथील रहिवासी आहे.यातील आरोपी विशाल अहिरे व सागर काळे यांना पोलिसानी अटक केली आहे.तर सागर साबळे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आदींनी भेट दिली आहे.जखमीस खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३१३/२०२१ भा.द.वि.कलम ३९४,३९७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिसनिरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.