जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव भाजपचा ओ.बी.सी.सोडून निळवंडे व पाच क्रं.तळ्यावरच ‘चक्काजाम’,वाहतूक ठप्प

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून बीड,औरंगाबाद,नवी मुंबईसह कोपरगाव शहरातही आंदोलन करण्यात आले आहे मात्र येथे ओ.बी.सी.समाजाच्या आरक्षणासाठी चक्का जाम होण्याऐवजी तो निळवंडे धरणावरील बंदिस्त जलवाहिनी आणि कोपरगावच्या पाच क्रंमांकाच्या साठवण तलावाच्या भोवतीच घुटमळत राहून या दोन विषयांचाच दुर्दैवाने ‘चक्काजाम’ पाहायला मिळाला आहे.त्यामुळे हे आंदोलन भरकटल्याचे दिसून आले आहे.तर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असतानाही येथे त्याचा रासरोस बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळाला असून पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली दिसून आली आहे त्याबाबत कोपरगाव शहर पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान राज्यात अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसताना साईबाबा कॉर्नरवर शासनाच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते.त्यांना कोपरगाव शहर पोलिसांनी संरक्षण पुरवलेले आढळले असून कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.त्यावेळी दोन तास दोन्ही बाजुंनी वाहतूक ठप्प झाली होती.त्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून बीड,औरंगाबाद,नवी मुंबईसह कोपरगाव शहरातही आंदोलन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका भाजपच्या वतीने साईबाबा चौकात हे ‘चक्काजाम आंदोलन’ माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.त्यावेळी हा गोंधळ पाहायला मिळाला आहे.

सदर प्रसंगी कोल्हे भाजपचे कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे,सुमित कोल्हे,माजी नगराध्यक्ष दिलीप दारूनकर, शहराध्यक्ष दत्तात्रय काळे,तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,पंचायत समितीचे माजी सभापती मच्छीन्द्र टेके,मच्छीन्द्र केकाण,सुनील देवकर,विश्वास महाले,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे,रवींद्र पाठक,रवींद्र रोहमारे,आरोग्य सभापती शिवाजी खांडेकर,बाळासाहेब आढाव,विनोद राक्षे,आर.पी.आय.चे दीपक गायकवाड,जितेंद्र रनशूर,प्रदीप नवले,माजी सरपंच दीपक चौधरी,आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना माजी आ.स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की,”निळवंडे धरणावरून आपण शिर्डीला आलेली जलवाहिनी कोपरगाव शहरासाठी मंजूर केली होती.मात्र आ.आशुतोष काळे यांनी ती पाच क्रमांकाचे तलावावर लक्ष केंद्रित करून हाणून पाडली आहे.संगमनेरला निळवंडेचे पाणी मिळालेले चालते मात्र कोपरगावला ते नाकारले जाते.असा भेदभाव का केला जात आहे.आपण पंधरा टक्केचे आरक्षणामधून ते मागीतले होते.मात्र विद्यमान आं.काळे हे पाणी देतो म्हणूनही शहरातील नागरिकांना देत नाही हे दुर्दैव आहे.उत्तर नगर मध्ये पंचवीस-पंचवीस वर्ष मंत्री राहिलेले नेते काहीही करत नाही.त्यांनीच निलवंडेसह अन्य प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोप करून आपण आपल्या कार्यकाळात विकास कामे केली असल्याचा दावा केला आहे.आपल्या काळात बिपीन कोल्हे यांनी कारखाण्याचा प्रकल्प बंद ठेऊन पाणी वाटले असल्याचा दावा केला आहे.(अर्थात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हि कृती झाली याचा सविस्तर विसर पडलेला दिसतो) या शिवाय नगरपरिषदेच्या इमारतीला निधी आणला आहे.श्रेय कोणीही घ्या पण शहराला पाणी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.व गत पाच वर्षातील पाणी आणू न शकलेल्या नेत्याने तीच पिपाणी पुन्हा वाजवली आहे.त्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.व कोरोना काळात या सरकारचे कर्तृत्व लपले आहे.त्यांना त्या आड लपण्यास जागा मिळाली असल्याचा आरोप केला आहे.व या सरकारात आ.काळे यांना कोणी गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप केला आहे.आपल्याला भाजप सरकारमध्ये गंभीर घेतले असल्याचा दावाही केला आहे.व आपण ओ.बी.सी.साठी अखेरपर्यंत लढा देऊ असे आश्वासन दिले आहे.

सदर प्रसंगी विवेक कोल्हे यांनीही पाच क्रमांकाचा साठवण तलाव व निळवंडे बंदिस्त जलवाहिणीवरच आपले लक्ष केंद्रित केले होते.व माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव पोलिस ठाणे व इमारत मंजुरी आरक्षण करून दिल्याचे उपकृत केल्याची जाणीव विवेक कोल्हे यांनी करून गुन्हे दाखल करणार नाही अशी अवास्तव मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,यांनी केले तर उपस्थितांना माजी सभापती मच्छीन्द्र केकाण,सुनील देवकर,माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर,जितेंद्र रणशूर,प्रदीप नवले,आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर उपस्थितांचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले आहे.

दरम्यान राज्यात अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नसताना साईबाबा कॉर्नरवर शासनाच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते.त्यांना कोपरगाव शहर पोलिसांनी संरक्षण पुरवलेले आढळले असून कुठलीही कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.दरम्यान आंदोलन हे ओ.बी.सी.समाजाचे आरक्षण मागणीसाठी असताना बऱ्याच वक्त्यांनी आपला रोख पाच क्रमांकाच्या तलावावर व निळवंडे जलवाहिणीवर खर्ची करून आंदोलनाची स्वकीय वक्त्यांनीच धार कमी केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कोपरगाव शहर व तालुका भाजप कोल्हे गटाचे वतीने ओ.बी.सी.आरक्षण संपविणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ आज ११.१५ वाजेच्या सुमारास सुरु झालेले आंदोलन १२.४५ वाजेपर्यंत दोन तास सुरु होते.त्यावेळी साईबाबा कॉर्नर चौकात दोन्ही बाजींनी नगर-मनमाड रास्ता बंद अकरण्यात आल्याने दोन्ही बाजुने वाहतूक खोळंबली होती.मात्र रुग्णवाहिका यांना रस्ता दिला जात होता.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close