जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाचा एक बळी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.त्यात रोज शुक्ल पक्षातील चंद्रकोरी प्रमाणे त्याला उतार येत आहे.कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५६१ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १२ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५४९ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४८३ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत १२ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०० असे एकूण अहवालात एकूण १२ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १९ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर काल कोपरगाव शहरात एकही रुग्णाचे निधन झाले नसले तरी मात्र तालुक्यातील करंजी येथील एक ७५ वर्षीय महिला रुग्णांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यामुळे अद्याप कोरोनाचे मृत्यू सुरु असल्याचे निष्पन्न होत आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ३४७ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०९३ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०३ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ८५ हजार १९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ४० हजार ७६८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १४.४९ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार ०५१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६० टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६४ हजार २५८ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार ४६६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५४ हजार ५४८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार २४३ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याच्या तयारीत दिसत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close