आरोग्य
कोपरगावात पुन्हा एकदा कोरोना सर्वेक्षण सुरु होणार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारसह नगरपरिषद प्रशासन हैराण झाले असून त्यावर मात करण्यासाठी आता प्रशासनाने आपली हालचाल सुरु केली असून कोपरगाव नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मोहिमेच्या माध्यमातून ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” पुढिल सप्ताहात घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून शासकीय यंत्रणा तोकडी पडू लागली असल्याचे विदारक चित्र आहे.कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार विविध आदेश जारी करत असले तरी खालच्या पातळीवर मात्र वस्तूस्थिती मात्र विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे.अशातच सरकारने आता घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी,”माझे कुटुंब,माझी जबाबदारी” हि योजना स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पुन्हा राबविण्याची तयारी केली आहे.
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून शासकीय यंत्रणा तोकडी पडू लागली असल्याचे विदारक चित्र आहे.कोविड उपचाराशी निगडीत सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार विविध आदेश जारी करत असले तरी खालच्या पातळीवर मात्र वस्तूस्थिती मात्र विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे.अशातच सरकारने आता घरोघरी जाऊन कोरोना रुग्णांची तपासणी करण्यासाठी,”माझे कुटुंब,माझी जबाबदारी” हि योजना पुन्हा राबविण्याची तयारी केली आहे.त्या साठी कोपरगाव नगरपरिषद सज्ज झाली असून त्यांनी आता हि तपासणीसाठी आपल्या अधिकारी कर्मचारी यांनी सज्ज राहण्यास सांगितलें आहे.हे कर्मचारी घरातील प्रत्येक व्यक्तीचे तापमान,ऑक्सिजन पातळी,सर्दी खोकला तसेच कोरोना संदर्भातील इतर लक्षणे असल्यास त्या व्यक्तीची दुसऱ्या दिवशी ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात येणार आहेत.त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मदत होणार आहेत.त्या करिता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,डॉ.गायत्री आहेर यांनी प्रभाग निहाय पथके तयार केले असुन सदर पथकात,आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका व शिक्षक व शिक्षिका यांचा समावेश आहेत.त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही प्रकारची माहिती न लपवता सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शेवटी केले आहे.