जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात आज कोरोनाचे सहा बळी,तपासणी संचाची कमतरता

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात नगर येथे २३८ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत १०७ अँटीजन तपासणीत १४,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ७५ असे एकूण अहवालात एकूण १९६ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १५६ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव तालुक्यातील सहा नागरिकांचे बळी गेले असून त्यात कोपरगाव येथील दोन पुरुष वय-७५,४६,स्वामी समर्थ नगर महिला वय-६४,तर संवत्सर येथील ७५ वर्षीय पुरुष,सुरेगाव येथील पुरुष वय-५८,जेऊर पाटोदा येथील पुरुष वय-४६ आदिंचा समावेश आहे.कोरोना मृत्यूचे तांडव आता गल्ली बोळात आता गोंधळ घालु लागले असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे त्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही नागरिक सकाळच्या आठ ते अकरा वाजेच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेबाबत अनावश्यक गर्दी करताना दिसत आहे,त्यामुळे आता पोलिसांना आपल्या हातातील काठीच्या मुठी आवळण्याची गरज निर्माण झाली आहे तर दुसरीकडे रुग्णांना तपासणीसाठी कोरोना किट उपलब्ध नाही.या शिवाय नागरिकांना देण्यात येणारी लस अद्याप उपलब्ध नसल्याने नागरिकांत अस्वस्थता दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ५८ हजार ८७१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २४ हजार ११७ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ३२ हजार ९२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ८२५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २४ दिवसात ६३ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close