जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.शिंदे यांची आत्महत्या

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर भाजपचे माजी शहराध्यक्ष व माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे कट्टर समर्थक प्रा.सुभाष आनंदराव शिंदे (वय-७३) यांनी आज सकाळी घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे त्यामुळे कोपरगावसह नगर जिल्ह्यातील भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,दोन नातवंडे असा परिवार आहे.

“स्व.प्रा.शिंदे यांच्या जाण्यामुळे आम्ही भाजप व कोपरगाव शहराने निष्ठावान मार्गदर्शक गमावला आहे.त्यांची उणीव नगरसह कोपरगाव भाजपला कायम जाणवत राहील”-विजय वहाडणे,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

प्रा.सुभाष शिंदे हे आपल्या बऱ्हाणपूर खान्देश या मूळ गावातून नोकरी निमित्त पहिल्यांदा राहुरीच्या पब्लिक स्कुलमध्ये १९७६ साली आले होते तेथून ते कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमय्या महाविद्यालयात रुजू झाले होते.त्यानंतर त्यांनी या महाविद्यालयात आपली मोठी सेवा देऊन सेवानिवृत्ती पत्करली होती.ते वयाच्या ५८ वर्षापर्यंत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.काही काळ त्यांनीं उप-प्राचार्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.त्यांनी या दरम्यान अनेक विद्यार्थी घडवले होते.त्यांचे विद्यार्थी नगर,औरंगाबाद,नाशिक आदी जिल्ह्यात असून ते गत पंधरा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते.तरीही ते भाजपचे निष्ठावान म्हणून कार्यरत होते.कोपरगाव शहर भाजपचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते.२०१६ साली संपन्न झालेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता.व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात जवळचे अनेक सहकारी काही कारणांनी तात्कालिक दुरावले होते मात्र प्रा.सुभाष शिंदे सर मात्र त्यांच्या पाठीशी गुण दोषासह खंबीरपणे उभे राहिले होते. विरोधक जेव्हा नगराध्यक्ष वहाडणे यांच्यावर टीका करत तेंव्हा ते वहाडणे यांची बाजू घेऊन विरोधकांवर तुटून पडत असल्याचे कोपरगाव शहर व तालुक्याने अनेक वेळा अनुभवले होते.त्यांच्या निधनाने नगराध्यक्ष वहाडणे यांनी आपला एक वरिष्ठ खंदा मार्गदर्शक गमावला आहे.

स्व.प्रा.शिंदे या चे मूळ गाव बऱ्हाणपूर हे होते.त्यांना उत्तर प्रदेशातील शिंदे घराण्याचा सार्थ अभिमान होता.तो त्यांच्या बोलण्यातून अनेक वेळा डोकावत असे.त्यांचा माजी तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष खा.सूर्यभान पा.वहाडणे यांच्या मुळे केंद्रीय भूपृष्ठ वहातुक मंत्री नितीन गडकरी,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,माजी मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांचेशी जवळून संपर्क आला होता.व ते नेते त्यांना नावानिशी ओळखत होते.

दरम्यान हि बाब सर्व प्रथम त्यांच्या सुनबाई यांच्या लक्षात आली त्यांनी याबाबत आपल्या कुटुंबियांना हि बाब लक्षात आणली दरम्यान त्यांच्या खिशात एक चिट्टी सापडली असून त्यात त्यांनी,”मी,कोणावरही अवलंबून राहू शकत नाही,माझ्या मर्जीने मी आत्महत्या करत आहे,त्यासाठी आपणच जबाबदार असून अन्य कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये”असे म्हटले असल्याचे आमच्या प्रतिनिधीस प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

त्यांच्यावर आज सायंकाळी ६ वाजता कोपरगाव अमरधाम येथे अंत्यविधी संपन्न होणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.

त्यांच्या निधनाबद्ल आ.आशुतोष काळे,कोपरगाव तालुका एज्युकेशनचे सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सोमैय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र बोरावके,भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव,सोमनाथ चांदगुडे,भाजप मीडिया सेलचे महाराष्ट्र उत्तर विभाग प्रमुख समीर आंबोरे,बाजार समितीचे संचालक सुधाकर गाढवे,माजी नगरसेवक संजय कांबळे,चेतन खुबाणी,सेनेचे शहर प्रमुख कलविंदर दडियाल आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

“स्व.प्रा.शिंदे यांच्या जाण्यामुळे आम्ही एक भाजपचा निष्ठावान मार्गदर्शक गमावला आहे.त्यांची उणीव नगर सह कोपरगाव भाजपला कायम जाणवत राहील”अशी प्रतिक्रिया कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नोंदवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close