आरोग्य
कोपरगावातील रुग्णवाढ चिंताजनक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०३ हजार ६८१ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ३६९ असून आज पर्यंत ४९ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.३३ टक्के आहे.तर एकूण २२ हजार ८२७ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९१ हजार ३०८असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १६.१३ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार २६३ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.६४ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ८२ हजार ५८ ९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ४२२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ७७ हजार ९८३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १८३ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-४२ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरात आज आलेल्या एकूण-२० बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.कोपरगाव महिला वय-५२,१५,५२,४१,३६,पुरुष वय-४०,४१,४१,ब्रिजलाल नगर पुरुष वय-३४,गोरखनगर महिला वय-३८,अंबिकानगर महिला वय-२८,खडकी पुरुष वय-६७,म्हसोबा मंदिर पुरुष वय-४०,इंदिरापथ पुरुष वय-६१,७१,इंद्रायणी हॉटेल महिला वय-८९,बाजार तळ महिला वय-४४,शिंगी-शिंदेनगर पुरुष वय-५१,साईनगर पुरुष वय-६६,संजयनगर महिला वय-४१,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील एकूण २२ रुग्ण आहे.त्यात धोत्रे पुरुष वय-५१,४४,महिला वय-३५,संवत्सर पुरुष वय-२४,३०,महिला वय-२२,कुंभारी पुरुष वय-४७,आपेगाव पुरुष वय-२०,महिला वय-४०,४५,येसगाव महिला वय-१८,गोधेगाव पुरुष वय-४०,धामोरी पूरुष वय-७०,डाऊच बु.पुरुष वय-४९,कोळपेवाडी पुरुष वय-२२,४२,१५,कारवाडी महिला वय-५७,दहेगावं बोलका पुरुष वय-७८,भोजडे पुरुष वय-६१,खिर्डी गणेश पुरुष वय-६५,धारणगाव पुरुष वय-६४,,आदींचा समावेश आहे.
दरम्यान कोरोना वाढीचा दर पुन्हा गतवर्षीप्रमाणे उच्चान्क गाठतो का असा संभ्रम तयार झाला होता तो दोन दिवसांपासून मोडीत निघाला आहे.आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असल्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.